गौतम गंभीर फाउंडेशन दोषी; ड्रग कंट्रोलरची हायकोर्टला माहिती

ड्रग्स अॅण्ड कॉस्मेटिक्स कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाईचे आदेश कोर्टाने ड्रग कंट्रोलरला दिले आहेत.
Gautam Gambhir
Gautam GambhirGoogle file photo
Summary

ड्रग्स अॅण्ड कॉस्मेटिक्स कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाईचे आदेश कोर्टाने ड्रग कंट्रोलरला दिले आहेत.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि दिल्लीतील आमदार प्रवीण कुमार हे दोघे कोरोनाची औषधे गोळ्या करण्यात दोषी आढळले आहेत. गौतम गंभीर फाउंडेशनतर्फे कोरोना रुग्णांना अनधिकृतपणे फॅबीफ्लू औषधे वितरित करण्यात आली होती. तसेच त्याचा साठाही केला होता. याबाबतची माहिती दिल्ली औषध नियंत्रकाने (Drug Controller) दिल्ली उच्च न्यायालयाला दिली होती. (Gautam Gambhir Foundation unauthorized stock of Covid medicines Drug Controller informs Delhi High Court)

ड्रग कंट्रोलरची बाजू मांडणाऱ्या वकील नंदिता राव म्हणाल्या की, ड्रग अँड कॉस्मेटिक कायद्यांतर्गत गौतम गंभीर यांच्या फाउंडेशनने गुन्हा केला आहे. बेकायदेशीरपणे औषधे साठविल्याबद्दल फाउंडेशनला दोषी ठरविण्यात येत आहे. त्याच कायद्यानुसार आम आदमी पक्षाचे आमदार प्रवीण कुमारही दोषी आढळले आहेत.

Gautam Gambhir
कोब्राचे प्राण वाचवण्यासाठी तरुणाने दिला चक्क तोंडाने श्वास

ड्रग कंट्रोलरने सादर केलेला अहवाल हा फक्त गंभीरच्या संदर्भात आहे की प्रवीणकुमार यांच्याशीही संबंधित आहे, अशी विचारणा कोर्टाने राव यांच्याकडे केली. त्याला उत्तर देताना राव म्हणाले की, सदर अहवाल हा आमदार प्रवीण कुमार यांच्याशीही संबंधित आहे आणि तेदेखील दोषी आढळले आहेत.

पुढील सुनावणी २९ जुलै रोजी होणार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ड्रग्स अॅण्ड कॉस्मेटिक्स कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाईचे आदेश कोर्टाने ड्रग कंट्रोलरला दिले आहेत. याशिवाय कोर्टाने यासंदर्भात अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे.

Gautam Gambhir
विधानसभा निवडणुकांमध्ये EVM, VVPATची मोजणी १०० टक्के जुळली - EC

दरम्यान, दीपक कुमार यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (पीआयएल) उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. गंभीर आणि या प्रकरणात सामील असलेल्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. ड्रग कंट्रोलरने दाखल केलेल्या अहवालाबाबत पूर्णपणे असमाधानी असून ड्रग कंट्रोलरने कायदेशीर बाबींकडे लक्ष दिले नाही, असे दिसते, अशी टिप्पणी आधीच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने केली होती.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com