कोब्राचे प्राण वाचवण्यासाठी तरुणाने दिला चक्क तोंडाने श्वास

व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
कोब्राचे प्राण वाचवण्यासाठी तरुणाने दिला चक्क तोंडाने श्वास
Updated on: 

आपल्या आजुबाजूला एखादा साप (Snake) दिसला तर आपली चांगलीच घाबरगुंडी उडते. भीतीमुळे आपल्या अंगाला घाम फुटतो. त्यातच अनेक जण साप दिसल्यावर त्याला मारायला धावतात. परंतु, सध्या सोशल मीडियावर अशा एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्याने चक्क एका सापाला तोंडाने श्वास देऊन (Man give breath to cobra by his mouth) नवं जीवनदान दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला असून अनेकांनी या तरुणाच्या हिमतीची दाद दिली आहे. (chhattisgarh-man-saved-cobra-snake-by-breathing-his-mouth-shocking-video-viral)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ छत्तीसगढमधील बस्तर (Bastar) येथील आहे. या गावात एक विषारी कोब्रा मरणासन्न अवस्थेत निपचित पडला होता. त्यामुळे या कोब्राला जीवनदान देण्यासाठी एका सर्पमित्राने स्ट्रॉच्या मदतीने आपल्या तोंडाने कोब्राला श्वास दिला. विशेष म्हणजे या कोब्राचे प्राण वाचले आणि त्याला नवीन जीवन मिळालं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

बस्तरमधील एका घरात कोब्रा शिरल्याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे सर्पमित्रांची टीम या गावात दाखल झाली आणि त्यांनी सापाला घरातून बाहेर काढलं. जवळपास ८ फूट लांब असलेला हा साप पकडल्यानंतर निपचित पडला होता. त्याला श्वास घेण्यास अडचण येत होती. ही बाब सर्पमित्राच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सापाच्या तोंडात एक स्ट्रॉ टाकला आणि आपल्या तोंडाने त्याने सापाला श्वास देण्याचा प्रयत्न केला.

कोब्राचे प्राण वाचवण्यासाठी तरुणाने दिला चक्क तोंडाने श्वास
कोरोनावर मात केलेल्या लहान मुलांना MIS-C चा धोका

दरम्यान, सर्पमित्राने केलेला हा प्रयत्न यशस्वी झाला आणि काही काळातच सापाने पुन्हा हालचाल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या सर्पमित्राने सापाला सुरक्षितरित्या जंगलात सोडलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला असून अनेकांनी या सर्पमित्राचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Breaking Marathi News live Updates
PM Kisan Beneficiary Status Check Online
Sugarcane price protest in Karnataka
Centre caps sugar stocks at 1,000 quintals for traders to curb hoarding during the festive season.
Marathi News Esakal
www.esakal.com