esakal | गेहलोत विरुद्ध पायलट; लक्ष्य 101, जाणून घ्या राजस्थानमधील आकड्यांचा खेळ
sakal

बोलून बातमी शोधा

pilot and gehlot.jpg

राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सभापतींच्या नोटीसीला आव्हान देणाऱ्या बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज निर्णय येण्याची शक्यता आहे.

गेहलोत विरुद्ध पायलट; लक्ष्य 101, जाणून घ्या राजस्थानमधील आकड्यांचा खेळ

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर आज राजस्थान उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सभापतींच्या नोटीसीला आव्हान देणाऱ्या बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजस्थानच्या राजकीय युद्धात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांपैकी कोणाच्या बाजूने न्यायालय निर्णय देते हे आज स्पष्ट होईल. तसेच कोणाच्या गटाकडे किती आमदार आहेत, याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहे. गेहलोत गटाच्या सूत्रांनुसार, गेहलोत यांना 102 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा करण्यात आला आहे.

देशात सर्वाधिक 19 कोटी रुपये वेतन घेणारे बँकर
गेहलोत यांच्याकडे 102 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्यात काँग्रेसचे 87 आमदार, भारतीय ट्राईबल पक्षाचे 2 आमदार, सीपीएमचे 2 आमदार, राष्ट्रीय लोक दलाच्या (RLD) एका आमदाराचा समावेश आहे. याशिवाय 10 अपक्ष आमदारांनी गेहलोत यांना पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यानुसार गेहलोत गटाकडे सध्या 102 आमदारांचे समर्थन आहे. काँग्रेसचा एक आमदार सध्या कोमामघ्ये आहे. 

बंडखोर आमदार अशोक पायलट यांचा गट भाजपसोबत गेला तर चित्र वेगळे दिसू शकते. भाजप आणि पायलट यांच्याकडे मिळून 96 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्यात भाजपचे 72 आमदार, सचिन पायलट यांच्या गटातील 18 आमदार, हुनमान बेनीवाल यांचे तीन आमदार आणि तीन अपक्ष आमदार यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र ते केरळ, चार राज्यांतून प्रवास करत 1 वर्षाने पोहोचला ट्रक
दोन्ही पक्षांकडून इतके आमदारांचे समर्थन असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या गटामध्ये 6 आमदारांचे अंतर आहे. पायलट यांनी सुरुवातीपासून 30 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आकड्याच्या खेळात कोण विजयी होतं हे पाहावं लागेल.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार गेहलोत यांनी राज्यपालांना सांगितले आहे की त्यांना आमदारांचा पाठिंबा आहे आणि सरकार पूर्णपणे स्थिर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभेचे अधिवेशन बुधवार-गुरूवारी बोलावले जाऊ शकते. या सत्रात फ्लोर टेस्ट होऊ शकते.