PM Modi: निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळण्याची अपेक्षा करणाऱ्यांना PM मोदींनी दिला मोठा संकेत; म्हणाले, 'आमचा उमेदवार...'

PM Modi: नवी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कमळ हेच आमचा उमेदवार आहे. ज्यांना दुसऱ्यांदा तिकीट हवे आहे त्यांच्यासाठी हा मोठा संदेश असल्याचं मानलं जात आहे.
PM Modi
PM ModiEsakal

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी राजधानी दिल्लीत भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींनी पक्षश्रेष्ठींना मोठे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीत कमळ हेच आमचा उमेदवार आहे.' कमळाचा विजय निश्चित करण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल, असंही ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या विधानामागे अनेक प्रकारच्या अटकळी बांधल्या जात आहेत. राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की, मोदींनी ज्यांना दुसरे तिकीट हवे आहे त्यांना हा मोठा मेसेज दिला आहे की, त्यांचे तिकीट कापले तरी नवीन उमेदवाराच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील.

अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू केले आहेत. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला एकट्याने 370 च्या पुढे जायचे आहे. याशिवाय एनडीएचे लक्ष्य 400 च्या पुढे आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. सर्व 543 जागांसाठी कमळाचे फूल उमेदवार असल्याचे ते म्हणाले. उमेदवारांची निवड होत राहिली तरी पुढील 100 दिवस कार्यकर्त्यांना मेहनत करावी लागणार आहे.

PM Modi
Shivrajyabhishek Sohala: 'शिवजयंती दिनी दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून दर्जा देणार', सुधीर मुनगंटीवर यांची माहिती

खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार

आगामी निवडणुकीत आपले लक्ष्य गाठण्यासाठी भाजपने खासदारांचे रिपोर्ट कार्ड आधीच तयार केल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत ज्यांचा अहवाल चांगला नाही त्यांना नक्कीच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. याशिवाय वयाची 70 वर्षे ओलांडलेल्या खासदारांनाही तिकीट दिले जाणार नाही. ज्या खासदारांची नावे कोणत्या ना कोणत्या मोठ्या वादात अडकली आहेत, त्यांची तिकिटेही रद्द होऊ शकतात.लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर तिकीट कापून भाजप नव्या रणनीतीसह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. यात केवळ खासदारच नाही तर अनेक मंत्रीही सहभागी होऊ शकतात.

बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तिकीट कापण्यासाठी जनतेकडून मिळणारा प्रतिसाद आधार ठरणार आहे. अशा परिस्थितीत तिकीट न मिळाल्यास बोलणे बंद करण्याची व्यवस्था आधीच करण्यात आली आहे. विविध राज्यात चांगले काम करणाऱ्या आमदारांनाही लोकसभेचे तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.

PM Modi
Crime News: तिहेरी हत्याकांडाने उडाली खळबळ! बाप, मुलगा अन् मुलीची गोळ्या झाडून हत्या, धक्कादायक कारण आले समोर

तिकीट कापण्याचे निकष काय असू शकतात?

वय, कामे आणि वाद यावर तिकीट कापण्याचे निकष असू शकतात, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी तिकीट कापले जाऊ शकते. याशिवाय सलग तीन वेळा निवडणूक जिंकलेल्या खासदारांची तिकिटेही रद्द होऊ शकतात. त्यांच्या भागात सत्ताविरोधी असण्याची शक्यता जास्त आहे. वादात अडकलेल्या आणि अत्यंत कमी मतांनी जिंकलेल्या नेत्यांवरतीही टांगती तलवार आहे. 2019 च्या निवडणुकीत 27 जागा अशा आहेत जिथे केवळ एक टक्क्याच्या फरकाने विजय मिळाला होता. दोन टक्क्यांच्या फरकाने जिंकलेल्या जागांची संख्या 48 आहे. या जागांवर उमेदवार बदलले जाऊ शकतात.

अहवालानुसार, भाजपचे 61 खासदार असे आहेत ज्यांचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त आहे. सलग तीन वेळा निवडणूक जिंकलेले 20 खासदार आहेत. यावेळी भाजप 2019 मध्ये ज्या जागांवर पराभूत झाला त्या जागांवर विशेष लक्ष देणार आहे. अशा 161 जागांपैकी किमान 67 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. बंगाल आणि तेलंगणासोबतच भाजपला आंध्र प्रदेशातूनही आशा आहेत जिथे जागा वाढवता येतील.

PM Modi
Kamal Nath News: 'काँग्रेसला आर्थिक फटका ते...', कमलनाथ यांच्या येण्याने भाजपला काय होणार फायदा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com