Shivrajyabhishek Sohala: 'शिवजयंती दिनी दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून दर्जा देणार', सुधीर मुनगंटीवर यांची माहिती

Shivrajyabhishek Sohala: शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त शिवजयंतीच्याच दिवशी दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.
Shivrajyabhishek Sohala
Shivrajyabhishek SohalaEsakal

शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त शिवजयंतीच्याच दिवशी दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे किल्ले शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम होईल. तर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रात्री आठ वाजता आग्र्यात लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवर उपस्थित राहणार आहेत.

Shivrajyabhishek Sohala
Raj Bhosale Reel Star:मारडाच्या तरुणाचं नशीब उजळलं, इन्स्टाग्रामवर रील करणारा राज झळकणार नागराज मंजुळेंच्या चित्रपटात

शिवजयंतीच्या निमित्ताने आग्र्याच्या किल्ल्याच्या दरबारात दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवर यांनी दिली आहे. यापुढे राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याची नवी ओळख निर्माण होणार आहे.

Shivrajyabhishek Sohala
Weather Update: पुढील 48 तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाने भरदरबारात अपमान केला. त्याच दरबारात येत्या सोमवारी 'जय शिवाजी-जय भवानी'च्या घोषणांचा जयघोष होईल आणि शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे, असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Shivrajyabhishek Sohala
Dawood Ibrahims Property: आधी दाऊदची संपत्ती घेतली, आता म्हणतो पैसे नाहीत.. मोठ्या रकमेचा जुगाड करण्यासाठी मागितली वेळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com