जनरल मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख; जाणून घ्या सर्व काही

भारतीय लष्कराचे अनुभवी आणि पराक्रमी अधिकारी जनरल मनोज पांडे यांनी आज लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
Gen Manoj Pande
Gen Manoj PandeSAKAL

देशाला आज नवा लष्करप्रमुख मिळाला. भारतीय लष्कराचे अनुभवी आणि पराक्रमी अधिकारी जनरल मनोज पांडे यांनी आज लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी एमएम नरवणे यांची जागा घेतली. विशेष बाब म्हणजे जनरल मनोज पांडे हे कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सचे पहिले अधिकारी आहेत, जे लष्करप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळतील. जनरल पांडे यांचा लष्करप्रमुख पदापर्यंतचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया.

ईस्टर्न कमांडचे माजी कमांडिंग ऑफिसर-

जनरल मनोज पांडे हे पूर्व कमांडचे कमांडिंग ऑफिसर होते आणि त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ पदही भूषवले आहे. जनरल मनोज पांडे यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक मिळाले आहेत. (General Manoj Pandey is the new Chief of Army Staff of India; Know everything)

Gen Manoj Pande
डोगरा रेजिमेंट केंद्राला १०० वर्ष पूर्ण, लष्करप्रमुख नरवणे यांनी दिली भेट

जनरल पांडे यांचा जन्म डॉ. सीजी पांडे आणि प्रेमा यांच्या पोटी झाला, जे ऑल इंडिया रेडिओचे उद्घोषक आणि होस्ट होते. त्यांचे कुटुंब नागपूरचे आहे. प्राथमिक शालेय शिक्षणानंतर जनरल मनोज पांडे नॅशनल डिफेन्स अकादमीत रुजू झाले. एनडीएनंतर, त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि अधिकारी झाले. 3 मे 1987 रोजी शासकीय दंत महाविद्यालयाच्या सुवर्णपदक विजेत्या अर्चना सालपेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये मुख्य अभियंता म्हणून केले काम-

जनरल मनोज पांडे यांना डिसेंबर 1982 मध्ये बॉम्बे सॅपर्स, कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बर्ली, यूकेचा एक भाग होते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते भारतात परतले आणि ईशान्य भारताच्या माउंटन ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर म्हणून नियुक्त झाले. लेफ्टनंट कर्नलच्या पदापर्यंत पोहोचल्यानंतर, त्यांनी इथिओपिया आणि एरिट्रियामधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये मुख्य अभियंता म्हणून काम केले.

Gen Manoj Pande
जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला लष्करप्रमुखाचा पदभार

एलओसीवर 117 अभियंता रेजिमेंटचे केले नेतृत्व-

जनरल मनोज पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर 117 इंजिनियर रेजिमेंटचेही नेतृत्व केले आहे. ऑपरेशन पराक्रम दरम्यान ते रेजिमेंट कमांडर होते. त्यानंतर त्यांनी आर्मी वॉर कॉलेज, महू येथे प्रवेश घेतला आणि हायर कमांड कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्यांना हेडक्वॉर्टर 8 माउंटन डिव्हिजनमध्ये कर्नल क्यू म्हणून नियुक्त करण्यात आले.

मेजर जनरल पदावर बढती मिळालेले, जनरल पांडे यांनी पश्चिम लडाखमधील उच्च उंचीवरील ऑपरेशन्समध्ये सहभागी असलेल्या 8व्या माउंटन डिव्हिजनचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी लष्कराच्या मुख्यालयातील मिलिटरी ऑपरेशन डायरेक्टरेटमध्ये अतिरिक्त महासंचालक (ADG) म्हणून काम केले. लेफ्टनंट जनरल पदावर बढती मिळाल्यानंतर त्यांनी दक्षिण कमांडच्या चीफ ऑफ स्टाफची जबाबदारीही सांभाळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com