2020 मधील आव्हानांना जवानांचे चोख प्रत्युत्तर; 'आर्मी डे'निमित्त लष्कर प्रमुखांचा संदेश

mukund narawane
mukund narawane

नवी दिल्ली- देशाच्या 73 व्या लष्कर दिनादिवशी लष्कर प्रमुख मुकंद नरवणे यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या जवानांची आठवण काढली. 2020 मध्ये उद्धभवलेल्या आव्हानांचा उल्लेख करत नरवणे म्हणाले की, भारतीय लष्कर देशाच्या सुरक्षासाठी समर्थपणे उभे होते. आपल्या देशांची अखंडता जवानांनी कायम ठेवली. 

नरवणे यांनी भारत-चीनमध्ये सुरु असलेल्या तणावावरही भाष्य केलं. आपल्या शूर जवानांनी शत्रूंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यात अनेक जवानांना आपला प्राणही द्यावा लागला. निर्माण झालेल्या वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी कटीबद्ध असलो, तरी प्रत्युत्तर देण्यास आम्ही निर्णायक ठरु शकतो. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कोणत्याही आक्रमणाला आम्ही हाणून पाडू शकतो, असं ते म्हणाले आहेत. 

भारतीय लष्कर सातत्याने दहशतवादाविरोधात करत असलेल्या लढ्याचा उल्लेख नरवणे यांनी यावेळी केला. जवांनानी कोरोना महामारीच्या काळात सेवा दिल्याचंही ते म्हणाले आहेत. भारतीय लष्कराचे अधिकृत पेजवर मुकुंद नरवणे यांचे पत्र ट्विट करण्यात आले आहे. 

भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तुमचं असामान्य धैर्य, प्रेरणा आणि कामाप्रति असलेलं समर्पण हे भारतीय लष्कराची खरी पंरपरा आहे आणि येणाऱ्या पीढीला यामुळे प्रेरणा मिळत राहिल, असं ते म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आर्मी डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, दरवर्षी 15 जानेवारीला जनरल केएम करीअप्पा यांच्या सन्मानार्थ लष्कर दिवस साजरा केला जातो. 1949 ला करीअप्पा यांनी ब्रिटिश जनरल सर फ्रांसिस बुचर Sir Francis Butcher यांच्याकडून पदभार घेतला होता. बूचर ब्रिटिश भारताचे शेवटचे कमांडर ठरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com