हे बरंय! पठ्ठ्याने सात वर्षांपूर्वी दुकानाचं नाव ठेवलं 'कोरोना'; आता होतोय फायदा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

दुकानमालक जॉर्ज यांचं म्हणणं आहे की, कोरोना महामारीनंतर त्यांच्या दुकानात आधीपेक्षा जास्त लोक येत आहेत.

कोट्टायम : 'कोरोना' नावाचा विषाणू आला आणि संपूर्ण जग घायकुतीला आलं. भारतच नव्हे तर संपूर्ण जग बंद करण्याची ताकद या डोळ्यांनाही न दिसणाऱ्या विषाणूने दाखवली. आठ महिन्यांपूर्वी भारतात आलेला हा विषाणू प्रत्येकाला घाबरवून घरी बंदीस्त करणारा ठरला. तेंव्हा त्यावेळी प्रत्येकाच्या तोंडात फक्त कोरोना हाच एक शब्द होता. कोरोना, लॉकडाऊन, क्वारंटाईन हे शब्द हळूहळू परवलीचेच झालेत. जगभरात थैमान घालणाऱ्या हा विषाणू जन्माला यायच्या आधीपासूनच केरळमध्ये सात वर्षांपूर्वी एका व्यक्तीने आपल्या दुकानाचे नाव 'कोरोना' असं ठेवलं होतं. 

हेही वाचा - Positive Story : मानलं राव! नोकरी सोडून शैलजा घेतेय भटक्या कुत्र्यांची काळजी

मात्र, सध्या परिस्थितीच अशी उभी ठाकली आहे की, लोक या नावाशिवाय दुसऱ्या कशाचीच चर्चा करत नाहीयेत. आणि याचाच फायदा या दुकानदाराला होत आहे. दुकानातील सामानाची नव्हे, तर नावाचीच जास्त चर्चा केली जात आहे. 

केरळमधील कोट्टायममधील हे दुकान आहे. त्या सात वर्षांपूर्वी या दुकानाचं नाव कोरोना असं ठेवलं होतं. मात्र, त्यांना त्यावेळी जराही हा अंदाज नव्हता की हे नाव सात वर्षांनंतर प्रत्येकाच्या भीतीचे कारण ठरणार आहे. मात्र, यामुळेच आता त्यांचे नावदेखील प्रसिद्धीस आले आहे. दुकानमालक जॉर्ज यांचं म्हणणं आहे की, कोरोना महामारीनंतर त्यांच्या दुकानात आधीपेक्षा जास्त लोक येत आहेत.

हेही वाचा - CBI ला चौकशीसाठी राज्यांची पूर्वपरवानगी आवश्यकच; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
जॉर्ज यांनी म्हटलंय की, कोरोना हा एक लॅटीन शब्द आहे. या शब्दाचा अर्थ क्राऊन म्हणजे मुकूट असा आहे. मी सात वर्षांपूर्वी माझ्या दुकानाचं हे नाव ठेवलं होतं. आता हे नाव माझ्या व्यापारासाठी हितकारक सिद्ध होत आहे. या दुकानात ते किचन, वार्डरोबचे सामान मिळते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: George a Kottayam based man who named his shop as Corona

टॉपिकस
Topic Tags: