CAA विरोधात आंदोलन केल्याने 'या' विद्यार्थ्याला देश सोडण्याचे आदेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

या विद्यार्थ्याचे नाव जेकब लिंथेडल असे आहे. तो मद्रास आयआयटीत भौतिकशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे (मास्टर्स) शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या विद्यापीठात CAAविरुद्ध झालेल्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. मात्र, आता त्याला असे केल्यामुळे थेट भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

चेन्नई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध (CAA) होणाऱ्या आंदोलनामुळे देश सध्या पेटला आहे. देशभरातील अनेक शहरांमध्ये CAAविरुद्ध आंदोलने होत आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या अनेक आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे. मद्रास आयआयटीच्या कॅम्पसमध्ये CAAविरुद्ध करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका जर्मन विद्यार्थ्याला चक्क देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या विद्यार्थ्याचे नाव जेकब लिंथेडल असे आहे. तो मद्रास आयआयटीत भौतिकशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे (मास्टर्स) शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या विद्यापीठात CAAविरुद्ध झालेल्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. मात्र, आता त्याला असे केल्यामुळे थेट भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

या आंदोलनात जेकबने '1933 ते 1945 आम्ही याच परिस्थितीत होतो,' असा सूचक संदेश लिहलेला फलक झळकावला होता. या माध्यमातून जर्मनीतील नाझी राजवट आणि भारतातील सद्यस्थितीची अप्रत्यक्ष तुलना करण्याचा प्रयत्न जेकबने केला होता. 

'जे शत्रूला जमलं नाही ते मोदी करतायत'

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार त्याला चेन्नईतील परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडून (एफआरआरओ) त्याला ईमेल आल्याचे त्याने सांगितले आहे. तो म्हणाला, ''मला चेन्ईमध्ये इमिग्रेशन अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले. या बैठकीत मला स्टुडंट व्हिसाच्या नियांमचे उल्लंघन केल्यामुळे भारत सोडावा लागेल असे सांगितले. मी त्यांना हे लेखी स्वरुपात मागितले मात्र, मला अद्याप असे कोणतेही पत्र मिळालेले नाही.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: German Student Told to leave India for protesting against CAA