Health Insurance: या सरकारी योजनेत मिळतो 5 लाखांचा मोफत आरोग्य विमा! ऑनलाइन कार्डसाठी असे करा अप्लाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Insurance

Health Insurance: या सरकारी योजनेत मिळतो 5 लाखांचा मोफत आरोग्य विमा! ऑनलाइन कार्डसाठी असे करा अप्लाय

Govenment Scheme: केद्र सरकार देशभऱ्यातील मध्ममवर्गीय आणि गरीब वर्गाच्या हितासाठी अनेक योजना काढत असते. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत तुम्ही लाखांचा आरोग्य विमा मोफत मिळवू शकता. या योजनेअंतर्गत सरकार पाच लाखांपर्यंतचा मोफत उपचार देते. तेव्हा ऑनलाइन अप्लाय कसे करावे ते जाणून घेऊया.

या योजनेचा आतापर्यंत साडेचार कोटी जनतेने घेतला लाभ

आतापर्यंत देशभरातील 4.5 कोटी लोकांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (PMJAY) लाभ घेतला आहे. याबाबतची माहिती नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी संसदेत दिली आहे. नरेंद्र मोदी सरकारने (Modi Govt) लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी 2018 मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरु केली होती

या योजनेचा असा घ्या लाभ

बहुतांश लोकांना या योजनेचा लाभ कसा घ्यावा ते माहितीच नाही. त्यामुळे अनेक गरजू लोकसुद्धा या योजनेपासून वंचित राहातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड बनवावे लागेल. ते कसे बनवायचे ते आपण जाणून घेऊया.

18 वर्षांवरील लोकांनी करावा अर्ज

18 वर्षांवरील लोक आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी (PMJAY) अर्ज करु शकतात. या योजनेचा अर्ज करण्यासाठी, सामाजिक आर्थिक आणि जातिगणना (SECC) मध्ये नाव असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही प्रथम PMJAY च्या अधिकृत वेबसाइट (mera.pmjay.gov.in) वर तुमची पात्रता तपासली पाहिजे.

योजनेसाठी लागणारी पात्रता कशी तपासावी?

आयुष्मान भारत कार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला PMJAY च्या अधिकृत वेबसाइट (mera.pmjay.gov.in) वर जा. यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा कोड टाका. यानंतर, OTP टाकून लॉगिन करा. लॉग इन केल्यानंतर, एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे तुमचे राज्य निवडा. यानंतर मोबाईल नंबर, नाव, रेशन कार्ड नंबर किंवा RSBY URN नंबर टाकून तुमची योग्यता तपासा. पृष्ठावर नाव दिसल्यास, तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहात.

असे करा अप्लाय

  • आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेची (PMJAY)पात्रता तपासल्यानंतर, आयुष्मान भारत कार्ड मिळविण्यासाठी setu..pmjay.gov.in वर जा

  • स्वतःची नोंदणी करा.

  • यानंतर, You Yoga KYC वर क्लिक करा

  • लॉग इन करून KYC पूर्ण करा.

हेही वाचा: Scheme For Student : सरकारची 'ही' योजना विद्यार्थांना करणार मालामाल; जाणून घ्या कसं?

केवायसी केल्यानंतर, कागदपत्रे आणि तपशीलांची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर कार्ड जारी केले जाईल. तुम्ही आयुष्मान भारतच्या पोर्टलवरूनही कार्ड डाउनलोड करु शकता. त्यानंतर या योजनेशी संबंधित रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करता येतील.