viral couple video
viral couple video

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Viral Video: गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published on

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेट्रोमध्ये रोमान्स, नाच-गाणी किंवा भांडण अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. मेट्रोमध्ये रील्स न करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. पण, त्याचं पालन लोकांकडून केलं जात नाही. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक कपल मेट्रोमध्येच भांडण करत असल्याचं दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणी तरुणाला मारत आहे. तरुण म्हणत आहे की, 'ही सार्वजनिक जागा आहे इथे मारु नको.' तरी तरुणी त्याला मारत राहते. मुलगा म्हणतो की, 'निघून जा इथून'. त्यावेळी दूर जात असलेली तरुणी परत येते आणि तरुणाला चापट मारते. यावेळी तरुण देखील तिला एक चापट मारतो.

viral couple video
Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

तरुणी तरुणाला म्हणते, 'थोडीतर इज्जत ठेव. लोक पाहात आहेत. मी आईला सांगणार आहे. असला मुलगा कोणालाही भेटू नये. माझ्या आयुष्यात येऊ नको. निघून जा तू इथून.' मेट्रोमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे. स्टॉप आल्यानंतर हे दोघे तरुण-तरुणी मेट्रोमधून उतरतात आणि निघून जातात. लोक या जोडप्याचे भांडण पाहून करमणूक करुन घेत असल्याचं दिसतं.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर लोकांच्या प्रतिक्रिया देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत. काहींनी म्हटलं की, ते भाऊ-बहिणी प्रमाणे भांडत आहेत. काहींनी इथे लिंग समानतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. तरुणी तरुणाला सार्वजनिक ठिकाणी मारते. पण, तरुण हे सर्व खूप संयमाने घेतो. व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेला नाही, पण सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

viral couple video
Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी जागेच्या मुद्द्यावरुन मेट्रोत वाद निर्माण झाला होता. एक महिला थेट पुरुषाच्या मांडीवर जाऊन बसली होती. मेट्रोमध्ये डान्स किंवा अश्लील चाळे करत असतानाचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

टीप: सदर घटना ही सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे करण्यात आली आहे. व्हिडिओची पुष्टी 'सकाळ माध्यम समूह' करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com