

Ghanta City
esakal
उत्तर प्रदेशातील प्रत्येक शहराची आणि खेड्यांची स्वतःची एक आगळीवेगळी ओळख आहे. कोणी आपल्या मिठायांसाठी प्रसिद्ध आहे, तर कोणी कापड बाजारासाठी. मात्र, यूपीच्या एटा (Etah) जिल्ह्यातील जलेसर (Jalesar) या एका छोट्याशा खेड्याने थेट युरोपपर्यंत आपली खनक पोहोचवली आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये किंवा वास्तवात आपण जेव्हा स्विर्त्झलँडच्या (Switzerland) आल्हाददायक वातावरणात तेथील सुंदर गायींच्या गळ्यात बांधलेल्या घंट्या पाहतो आणि ऐकतो, तेव्हा त्या स्विर्त्झलँडमध्ये नव्हे, तर उत्तर प्रदेशातील जलेसरमध्ये बनवलेल्या असतात, हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. जलेसर हे ठिकाण आज जगभरात 'घुंगरू आणि घंटांचा टाऊन' म्हणून ओळखले जाते. येथे पितळेचे घंटे आणि घंट्या बनवणारे सुमारे ४०० सक्रिय कारखाने आहेत.