गंगा पर्यटनासाठी ‘घाट में हाट’ योजना

विविध खात्यांच्या साथीत पर्यटन मंत्रालयाटा पुढाकार
Ghat Mein Haat scheme Ganga
Ghat Mein Haat scheme Gangasakal

नवी दिल्ली : गंगा नदीच्या किनारी पर्यटनाचे जाळे उभारण्यासाठी केंद्राने ‘घाट मे हाट’ ही योजना आखली आहे. पर्यटन मंत्रालयाकडून विविध खात्यांच्या साथीत या योजनेला लवकरच मूर्त स्वरूप लाभेल.ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या गंगेलगतच्या स्थानांच्या पर्यटनासह लगतच्या परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा यामागील उद्देश आहे. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा अर्थात राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन या संस्थेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गंगेलगत आम्ही १६४ घाट बांधले आहेत, पण तेथे व्यवस्थापन आणि देखभाल करण्यास कुणी नाही. अशावेळी स्थानिक लोकांच्या उपजीविकेसाठी त्याचा वापर करण्यास काय हरकत आहे असा विचार आम्ही केला. तेथे रोज आरती आयोजित करण्यास आम्ही काही मंडळांना सांगू शकतो. त्यामुळे पर्यटन आकर्षित होतील.

तेथे हाटचे आयोजन करून स्थानिक वस्तूंची विक्री सुरु करता येईल. शेतकरी दर आठवड्याला या घाटांवर येऊन त्यांचा माल विकू शकतात. पर्यटकांची वर्दळ वाढताच अगदी वाहनतळ शुल्कापासून अनेक मार्गांनी महसुल मिळू शकेल. व्यापाऱ्यांमुळे अनौपचारिक रोजगारनिर्मिती होईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध महोत्सव आयोजित करण्याची योजना ही आहे.

गंगा नदीची लांबी २,५२० किलोमीटर आहे. हरिद्वार, वाराणसी, प्रयागराज, कानपूर, गाझीपूर, पाटणा, कोलकाता अशा शहरांमधून ही नदी वाहते. २०१४ पासून नमामी गंगे उपक्रम सुरु करण्यात आला असून नदी स्वच्छ करण्यासाठी मोठा निधी पुरविला जातो. यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद आहे.

प्रस्तावित गंगा सर्किट या पर्यटन मंत्रालयाची योजनेची सध्या आखणी सुरु आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहार या राज्यांचा यात सहभाग आहे. राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनतर्फे याची श्वेतपत्रिका लवकरच तयार होईल.

राज्यांचा पुढाकार

गंगेच्या परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी राज्यांनी पुढाकार घेतला आहे.

  • बिहार : राज्य सेंद्रिय मोहिमेनुसार सेंद्रिय मालाचे उत्पादन आणि मार्केटींगला चालना

  • उत्तर प्रदेश : शहरी भागात सेंद्रिय वृक्षारोपणास चालना, शहरांमधील निवासी वसाहतींमध्ये सेंद्रिय मालाच्या खरेदीसाठी मंडीचे आयोजन

  • उत्तराखंड : चार धाम यात्रा मार्गावर सेंद्रिय मालासाठी २० मोठी आणि ४१० छोटी विक्री केंद्रे

  • झारखंड : राज्यात प्रामुख्याने गंगेच्या किनारी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सेंद्रिय शेती प्राधिकरणाची स्थापना

  • पश्चिम बंगाल : सुंदरबन परिसरात भव्य वृक्षारोपण मोहीम, दहा हजार एकर जमिनीवर १५ कोटी झाडे लावणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com