शाळेपेक्षा तुरुंगाची ओढ! दहावीतल्या विद्यार्थ्यानं केला मित्राचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime News

शाळेपेक्षा तुरुंगाची ओढ! दहावीतल्या विद्यार्थ्यानं केला मित्राचा खून

गाजीयाबाद मधील मसुरी परिसरात हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मसुरी पोलीस स्टेशन हद्दीतील इयत्ता 10 मधे शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेपासून आणि अभ्यासापासून सुटका मिळावी या हेतूने इयत्ता 8 मधे शिकत असणाऱ्या आपल्या मित्राचा खून केला आहे.

मसुरी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणारा नीरज मिस्त्री हा मुलगा इयत्ता 8 मधे शिकत होता, शेजारी राहणारा किशोर 16 वर्षाचा आणि इयत्ता 10 वी मध्ये शिकत असणारा मुलगा त्याचा मित्र होता. सोमवारी दुपारी 4 वाजता आरोपी किशोर ने निरजला फिरण्यासाठी घेऊन गेला. आणि दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे वर घेऊन जात त्याचा गळा दाबून खून केला.

नीरज बेशुद्ध होऊन खाली पडला त्यानंतर आरोपी किशोर तेथून निघून गेला. तेथून येणाऱ्या नागरिकांनी नीरजला पाहिलं आणि पोलिसांना त्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी येऊन तातडीने नीरजला जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

मसुरी पोलीस स्टेशनचे SHO रवींद्र चंद पंत यांनी सांगितल की नीरजला शेवटचं किशोर सोबत पाहिलं होत. त्या नंतर पोलिसांनी आरोपी किशोरला त्याच्या घरापासून अटक केली आहे. त्यांनतर आरोपीला खून करण्याचं कारण विचारलं असता सांगितल की मला शाळा शिकायची नाही.आणि शाळेपासून सुटका मिळावी यासाठी मला जेल मध्ये जायचं होत, त्यामुळं मी निरजचा खून केला.

Web Title: Ghaziabad Crime 10th Student Killed Teenager Friend Planned Jail Escape School Study

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :policecrimeschool