Yati Narsinghanand Giri: संतांची पदयात्रा पोलिसांनी रोखली; नरसिंहानंदांना का केलं नजरकैद? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yati Narsinghanand Giri News

Yati Narsinghanand Giri: संतांची पदयात्रा पोलिसांनी रोखली; नरसिंहानंदांना का केलं नजरकैद?

गाझियाबादः हिंदू समाजाला जागरुक करण्यासाठी गाझियाबाद ते मेरठ अशी संतांची पदयात्रा आयोजित करण्यात आलेली होती. मात्र ही पदयात्रा पोलिसांनी रोखली आहे.

जूना आखाड्याचे महामंडलेश्वर यति नरसिंहानंद गिरी महाराज यांना पोलिसांनी तीन दिवसांसाठी नजरकैद केलंय. पोलिसांनी आपल्याला जेलमध्ये सडवण्याची धमकी दिल्याचा आरोप महंत यति यांनी केलाय. गाझियाबादचे पोलिस अधीक्षक देहात ईरज राजा आणि एसडीएम विनय कुमार सिंह हे पदयात्रा सुरु होण्यापूर्वीच डासना येथील शिवशक्तीधाम येथे पोहोचले.

अधिकाऱ्यांनी कलम 144 लागू असल्याचं सांगून त्यामुळेच नरसिंहानंद गिरी यांना तीन दिवसांसाठी नजरकैद केल्याचं सांगितलं.

डासना येथील शिवशक्तीधामचे मठाधिपती आणि श्रीपंचदशनाम जूना आखाड्याचे महामंडलेश्वर यति नरसिंहानंद गिरी महाराज आपल्या 20 शिष्यांना घेऊन पदयात्रेचं नियोजन केलं होतं.

हेही वाचा: Thailand Shooting: लहान मुलांच्या 'नर्सरी'त गोळीबार; 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू

ही पदयात्रा शिवशक्तीधाम डासना ते मेरठच्या खजुरीपर्यंत आयोजित केली होती. हिंदू समाजाने स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासंबंधी जागृती करण्यात येणार होती. त्यांनी सांगितलं होतं की, आज देशात हिंदू कुटुंबांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे ही संतांची पदयात्रा इतिहास रचणार आहे. शिवाय हिंदुंमध्ये आत्मविश्वास जागृत करणारी आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी आपल्याला साथ द्यावी, असं नरसिंहानंद गिरी यांनी आवाहन केलेलं.

हेही वाचा: Dasara 2022 : बाजारपेठेचे सीमोल्लंघन; दसऱ्याचा मुहूर्त साधत ग्राहकांकडून खरेदी

मात्र नरसिंहानंद गिरी यांची पदयात्रा पोलिसांनी रोखली आणि त्यांना तीन दिवसांसाठी नजरकैद केलं आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासनावर गंभीर आक्षेप केलेत.

टॅग्स :Uttar PradeshSection 144