esakal | हैदराबादच्या स्थानिक निवडणुका भाजपसाठी का आहेत खास?
sakal

बोलून बातमी शोधा

hydrabad.

ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन (GHMC) च्या 150 जागांसाठी 1 डिसेंबरला निवडणुका होत आहेत.

हैदराबादच्या स्थानिक निवडणुका भाजपसाठी का आहेत खास?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन (GHMC) च्या 150 जागांसाठी 1 डिसेंबरला निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी भाजप जीव तोड प्रयत्न करत आहे. अनेक खासदार, मंत्री यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. शहांनी मंदिरात पूजा केल्यानंतर सिकंदराबादमध्ये रोड शो केला. 

GHMC च्या मागील निवडणुकीत तेलंगाना राष्ट्रीय समितीला 99 जागा मिळाल्या होता. दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमला 44 जागा, तर भाजपला केवळ 4 जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी एमआयएम आणि भाजप निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न करत आहे. 

ही महापालिकेची निवडणूक आहे की पंतप्रधानपदाची, ओवेसींचा भाजपवर निशाणा

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये ओवेसींच्या पक्षाने 5 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसरीकडे भाजप पहिल्यांदाच बिहारमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत आला आहे. दोन्ही पक्षांनी धार्मिक ध्रुवीकरण करुन विधानसभेत चांगले यश मिळवलं आहे. हाच प्रयोग उभय पक्ष पश्चिम बंगालमध्ये करणार आहेत, त्यापूर्वी भाजप आणि एमआयएमने हैदराबादची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. 

भाजप आणि  एमआयएम धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करत आले आहेत. आकड्यांवर लक्ष टाकल्यास हैदराबादची धार्मिक बनावट आणि लोकसंख्येमुळे भाजपच्या विस्तारवादी नितीला निजामाच्या या शहरात फोकस करण्यासाठी भाग पाडले आहे. ग्रेटर हैदराबादमध्ये जवळजवळ 64.9% हिंदू आहेत, तर 30.1% मुस्लिम आहेत. येथे 2.8% ख्रिश्चन,  0.3% जैन, 0.3% शीख लोकसंख्या आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचा झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न

जून्या हैदराबादमध्ये मुस्लीम संख्या मोठी आहे. ग्रेटर हैदराबादच्या 10 विधानसभा जागांपैकी 7 वर 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या मुस्लिमांची आहे. येथे AIMIM चा ताबा आहे. असे असले तरी दुब्बका पोटनिवडणुकीत टीआरएसला हरवत विजय प्राप्त करणारी भाजप GHMC निवडणुकीत यश मिळवून दक्षिणेमध्ये स्थानिक स्तरावार संघटना विस्तार करु पाहात आहे. तसेच भाजपचा प्रभाव देशभर आहे, असा संदेश देऊ पाहात आहे. दक्षिणेचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. 

loading image