राहुल गांधी भाजपसाठी वरदानच; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा कॉंग्रेसला टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulam Nabi Azad

राहुल गांधी भाजपसाठी वरदानच; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा कॉंग्रेसला टोला

गुलाब नबी आजाद यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजप नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी गुलाब नबी आझाद यांच्या राजीनाम्या नंतर कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. हिमंत विश्व शर्मा "म्हणाले की जर तुम्ही गुलाम नबी आझाद यांचे पत्र आणि मी 2015 मध्ये लिहिलेले पत्र वाचले तर तुम्हाला काही प्रमाणात समानता आढळेल.

राहुल गांधी अनुभवी आहेत हे काँग्रेसमधील सर्वांनाच माहीत आहे. सोनिया गांधी यांच पक्षावर लक्ष नाही, त्या फक्त मुलाला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. "ते पुढे म्हणाले या कारणा मुळेच कॉंग्रेसचे निष्ठावंत लोक पक्ष सोडत आहेत. मी एकदा भविष्यवाणी केली होती एक वेळ आशी येईल की कॉंग्रेसमध्ये फक्त गांधी परिवारच राहील आणि आता हे खरं होताना दिसत आहे. पुढे म्हणाले खरंच राहुल गांधी भाजपसाठी वरदान आहेत.

हेही वाचा: पोळ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा स्वित्झर्लंड न्यायालयात मोठा विजय

गुलाब नबी आझाद यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया

पक्षश्रेष्ठीने ज्या व्यक्तीचा आदर केला.आणि आता जर तोच पक्षावर आशा प्रकारे टीका, करत असेल तर त्यातून व्यक्तीचे खरे चारित्र्य समोर येते. काँग्रेस महागाई, बेरोजगारी आणि ध्रुवीकरणाविरुद्ध लढा देत असताना, हा राजीनामा दिला, हे अत्यंत दु:खद आहे.- काँग्रेस

गुलाम नबी आझाद यांच्यासारखे ज्येष्ठ नेते विरोधकांच्या आणि जनतेच्या आवाजाला बळ देतील अशी आम्हाला अपेक्षा होती. - काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन

राज्यसभेचा कार्यकाळ संपताच आझाद अस्वस्थ झाले, क्षणभरही ते पदाशिवाय राहू शकले नाहीत - पवन खेरा

Web Title: Ghulam Nabi Azad Resignation Himanta Biswa Sarma Rahul Gandhi Blessing Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..