मी मोदींच्या धोरणांवर टीका करतो, राहुल गांधींप्रमाणं कोणाला शिव्या देत नाही : गुलाम नबी आझाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ghulam Nabi Azad vs Rahul Gandhi

'पंतप्रधान वेडे नाहीत, जे आम्हाला काँग्रेस मजबूत करण्यासाठी पत्र लिहायला सांगतील.'

मी मोदींच्या धोरणांवर टीका करतो, राहुल गांधींप्रमाणं कोणाला शिव्या देत नाही : गुलाम नबी आझाद

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी नुकतंच एक मोठं वक्तव्य केलंय. राहुल गांधींप्रमाणं मी वैयक्तिक हल्ले करत नाही. मी 7 वर्षे संसदेत नरेंद्र मोदींसमोर (Narendra Modi) बसून त्यांच्या धोरणांवर टीका केलीय, पण राहुल गांधींप्रमाणं (Rahul Gandhi) मी कोणाला शिव्या देत नाही. मी धोरणांवर टीका करतो, असं स्पष्ट मत गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केलं.

पत्र नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून लिहिल्याचा खोटा प्रचार

काँग्रेस नेते जयराम रमेश (Congress leader Jairam Ramesh) यांनी गुलाम नबी आझाद यांच्या मुलाखतीची क्लिप शेअर केली असून वातावरणात बदल होत असल्याचं सांगितलं. रमेश यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, वातावरणात बदल झाला असून आता हे लोक भाजपचे निष्ठावान सैनिक बनलेत, असं त्यांनी नमूद केलंय. आझाद यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की, G23 च्या स्थापनेनंतर राहुल गांधींनी माझं नाव भाजपशी जोडण्यास सुरुवात केली. आम्ही राष्ट्रपतींना पत्र लिहिल्यावर ते संतप्त झाले आणि त्यांनी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून लिहिल्याचा खोटा प्रचार सुरू केला. पंतप्रधान वेडे नाहीत, जे आम्हाला काँग्रेस मजबूत करण्यासाठी पत्र लिहायला सांगतील, अशी टीका त्यांनी राहुल गांधींवर केलीय.

हेही वाचा: Indian Economy : काही वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल : अमित शाह

'माझ्याकडं कोणताही काळा पैसा नाही, त्यामुळं मी कशाला घाबरू'

गुलाम नबी आझाद यांना कोणीही आदेश देऊ शकत नाही. माझ्यावर एकही केस नाही किंवा एकही एफआयआर नाही. माझ्याकडं कोणताही काळा पैसा नाही, त्यामुळं मी कशाला घाबरू, असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं. गुलाम नबी आझाद काँग्रेस सोडल्यानंतर स्वत:चा पक्ष स्थापन करणार आहेत. रविवारी एका सभेत ते म्हणाले, येत्या 10 दिवसांत आम्ही राजकीय पक्ष स्थापन करू. मला माहित आहे की काय होऊ शकतं आणि काय नाही, असंही ते म्हणालेत.

हेही वाचा: Vedanta-Foxconn Project : 'महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचं पाप सरकारनं केलं'

Web Title: Ghulam Nabi Azad Says I Am Not Like Rahul Gandhi I Dont Abuse Jammu And Kashmir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..