Indian Economy : काही वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल : अमित शाह

2014 मध्ये भारत जगातील 11 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती.
Amit Shah India Economy
Amit Shah India Economyesakal
Summary

2014 मध्ये भारत जगातील 11 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शाहांनी (Amit Shah) देशातील अर्थव्यवस्थेबाबत मोठं वक्तव्य केलंय. काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असं वक्तव्य त्यांनी केलंय. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात सहकार क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असंही शाह म्हणालेत.

शाह पुढं म्हणाले, एवढंच नाही तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) 2 लाख नवीन दुग्ध सहकारी गावं उभारण्यासाठी सरकार मदत करणार आहे. डेअरी उद्योगानं व्यावसायिकता अंगीकारली पाहिजे. या तंत्रज्ञानाबरोबरच संगणकीकरण आणि डिजिटल पेमेंटचा अवलंब केला पाहिजे. या गोष्टींशिवाय पुढं जाणं खूप कठीण आहे. दुग्ध व्यवसायानं दुधाची वाढती देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं शाह म्हणाले.

Amit Shah India Economy
Pashu Aadhar : माणसांप्रमाणं आता म्हशींचंही बनणार आधार कार्ड; PM नरेंद्र मोदींची घोषणा
Summary

'2014 मध्ये भारत जगातील 11 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती'

इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन वर्ल्ड डेअरी समिटमध्ये (International Dairy Federation World Dairy Summit) बोलताना अमित शाह म्हणाले, 2014 मध्ये भारत जगातील 11 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. परंतु, आता पाचव्या क्रमांकावर आहे. मला खात्री आहे की, काही वर्षांत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. जेव्हा भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, तेव्हा सहकार क्षेत्राचं महत्वही वाढणार आहे. सध्या 48 वर्षांनंतर ही परिषद होत आहे. भारत आता दूध उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे, आता त्याची निर्यातही होत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Amit Shah India Economy
VIDEO : तामिळनाडूत DVAC ची मोठी कारवाई; माजी मंत्र्याच्या 26 ठिकाणांवर छापे, 7 आमदार ताब्यात

'नैसर्गिक शेती ही डेअरी उद्योगाची जीवनरेखा आहे'

कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. दुग्धव्यवसाय आणि सहकार क्षेत्रानं ग्रामीण विकासात मोठं योगदान दिलं आहे. नैसर्गिक शेती ही डेअरी उद्योगाची जीवनरेखा आहे, त्यामुळं आरोग्य सुधारेल आणि देशाची आर्थिक स्थितीही सुधारेल, असं शाहांनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com