तरुणीला मारहाण करत धिंड; मध्य प्रदेशातील धक्कादायक प्रकार

वृत्तसंस्था
Thursday, 5 September 2019

मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथे १९ वर्षीय आदिवासी तरुणीला मारहाण करत धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मध्य प्रदेश ( अलिराजपूर) : मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथे १९ वर्षीय आदिवासी तरुणीला मारहाण करत धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्या जमातीमधील तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांमध्ये तरुणीच्या कुटुंबीयांचांच समावेश होता.

तरुणीला मारहाण होतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणीला दुसऱ्या जमातीमधील तरुणासोबत प्रेम झालं होतं. कुटुंबीयांना जेव्हा यासंबंधी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी प्रियकरासोबत पळून गेली होती. काही दिवसांनी नातेवाईकांनी तिचा शोध घेत पुन्हा घरी आणलं. यावेळी संपूर्ण रस्ताभर तरुणीला मारहाण करत धिंड काढण्यात आली.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी कारवाई करत मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३१ ऑगस्टची असून, आम्ही तपास सुरु केला असल्याचं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl harassment case in MP