Video: 'ओय गोरिये, गोली चल जाएगी' अऩ् खरंच...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

'ओय गोरिये.. गोली चल जाएगी...' या गाण्यावर युवती नृत्य करत असताना एकाने पिस्तूल काढून गोळीबार केला. एक गोळी युवतीला लागल्यामुळे ती जखमी झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चित्रकूट (उत्तर प्रदेश): 'ओय गोरिये.. गोली चल जाएगी...' या गाण्यावर युवती नृत्य करत असताना एकाने पिस्तूल काढून गोळीबार केला. एक गोळी युवतीला लागल्यामुळे ती जखमी झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चित्रकूट जिल्ह्यातील टिकरा गावात ही घटना घडली आहे. गावातील सपना नावाच्या मुलीचा विवाह होता. विवाहानिमित्त मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री बाराच्या सुमारास हिना नावाची युवती स्टेजवर 'ओय गोरिये.. गोली चल जाएगी' या गाण्यावर नृत्य करत होती. यावेळी एक युवक नाचत स्टेजवर आला. स्टेजवरून त्याला खाली येण्यासाठी सांगितले. त्याने मध्येच पिस्तूल काढला अन् तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी हिनाच्या जबड्याला लागली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. हिनाला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक बलवंत चौधरी यांनी सांगितले की, "हिनावर लखनौ येथे उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे. युवकाने मद्यधुंद अवस्थेत गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱया युवकाची ओळख पटली असून, त्याचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास सुरू आहे.' दरम्यान, गोळीबार होताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl shot for pausing dance at wedding ceremony in up