आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवतीचा प्रियकरासोबत विवाह!

वृत्तसंस्था
Tuesday, 6 October 2020

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱया युवतीचा पोलिसांनी प्रियकरासोबत विवाह लावून दिला आहे. संबंधित विवाहाची परिसरात चर्चा रंगली असून, पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

नवी दिल्ली: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱया युवतीचा पोलिसांनी प्रियकरासोबत विवाह लावून दिला आहे. संबंधित विवाहाची परिसरात चर्चा रंगली असून, पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

हाथरसमध्ये पुन्हा बलात्काराची घटना; चिमुरडीचा मृत्यू

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका 24 वर्षीय युवतीला प्रियकरासोबत विवाह करायचा होता. गेल्या तीन वर्षांपासून ते एकत्र राहात होते. पण, दोघामध्ये भांडण झाले होते. भांडणानंतर युवतीने स्वतःला जखमी करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याबद्दलची माहिती गोविंदपुरी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी दोघांची समजूत काढली. शिवाय, दोघांच्या कुटुंबियांची संमती मिळवली.  5 ऑक्टोबर रोजी आर्य समाज मंदिरात दोघांचा विवाहसोहळा पार पडला आणि नवविवाहित जोडपे आशिर्वाद घेण्यासाठी पोलिस स्टेशन गोविंदपुरी पोहचले. नवविवाहित जोडप्याला पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी 'कन्यादान' आणि भेटवस्तू देऊन स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

तीन पायांच्या बाळाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

दरम्यान, एप्रिल महिन्यातही अशाचप्रकारे पोलिसांच्या मदतीने एक विवाह झाला होता. दिल्ली पोलिसांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl was married to her lover by the delhi police help