बॉयफ्रेंडच 'किडका'; किडनी दिलेल्या प्रेयसीला दिला धोका

आपण कोणाचा तरी जीव वाचवला आहे, याबद्दल कॉलीन ली आनंदी आहे
Broke up
Broke upटिम ई सकाळ
Updated on

सध्या प्रेमाची परिभाषा समजायला अवघड आहे. हल्ली प्रेम करणे आणि ते निभावणे हे प्रत्येकाला जमत नाही अशातच प्रेमासाठी काहीही करू इच्छिनाऱ्या कैलिफोर्नियाच्या टिकटॉकर कॉलीन ली ही सर्वांना लक्षातच असेल. तिने तिच्या बॉयफ्रेन्डला किडनी दान केली होती मात्र तिला काय माहिती की ज्याला तिने किडनी दान केली तोच तिच्यासोबत सात महिन्यानंतर ब्रेक अप करणार. कॉलीन लीने २०२० वर्षी टिकटॉकच्या माध्यमातुन आपण बॉयफ्रेन्डला किडनी दिल्याचे सांगितले होते.

२०१६ मध्ये तिने आपल्या बॉयफ्रेंडला किडनी डोनेट केली आणि काही महिन्यांनंतर त्याने तिला धोका दिला. या नात्याची सुरवात २०१५ मध्ये झाली होती. याआधी पासुनच त्याला किडनीचा आजार होता. त्यानंतर कॉलीनने तिच्या बॉयफ्रेंडला किडनी दान करण्याचे ठरविले. त्यांनी टेस्ट केली तर त्यात त्यांच्या किडनी मॅच झाल्या. कॉलीन लीने किडनी दान केली. ऑपरेशनच्या सात महिन्यानंतर मात्र बॉयफ्रेंडने तिला ब्रेकअप दिले.

Broke up
हिजाबशिवाय येणार नाही, विद्यार्थ्यांनींच्या निर्णयामुळे सुट्टी जाहीर

नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कॉलीन याबद्दल कोणताही पश्चात्ताप नसल्याचे सांगताना दिसत आहे. कोणाचा तरी जीव वाचवला आहे, याबद्दल ती आनंदी आहे. कॉलीन म्हणते, "मला स्वत:चा अभिमान वाटतो की मी कुणाला तरी जगण्याची दुसरी संधी दिली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com