प्रियकराचे गुप्तांग हातात घेऊन पोचली चौकीत...

वृत्तसंस्था
Wednesday, 25 September 2019

दोघांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध. विवाह करण्यासाठी ती त्याच्याकडे मागणी करत होता. मात्र, तो नकार देत होता. चिडलेल्या प्रेयसीने प्रियकराचे गुप्तांग कापून थेट पोलिस चौकीत पोचली.

बराकपूर: दोघांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध. विवाह करण्यासाठी ती त्याच्याकडे मागणी करत होता. मात्र, तो नकार देत होता. चिडलेल्या प्रेयसीने प्रियकराचे गुप्तांग कापून थेट पोलिस चौकीत पोचली. युवतीला पाहून पोलिसही चक्रावून गेले.

पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील झाडूबाला गावामध्ये ही घटना घडली. जखमी प्रियकराला उपचारासाठी कोलकता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाडूबाला गावामध्ये राहणारी मौसमी हिचे गावामधील सुरजीत याच्यासोबत अनेकवर्षांपासून प्रेमसंबंध होते. मौसमी सुरजीतकडे विवाहाची मागणी करत होती. परंतु, तो विवाहास नकार देत होता. यामुळे चिडलेल्या मौसमीने त्याला भेटायला बोलवून त्याचे गुप्तांग कापले व पोलिस चौकीत पोचली. सुरजीतला उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. मौसमीला न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.

मौसमीने चौकशीदरम्यान सांगितले की, 'गेल्या अनेक वर्षांपासून आमचे प्रेमसंबंध आहेत. आमच्या प्रेमाबद्दल नातेवाईक व ग्रामस्थांनाही माहित आहे. अनेक वर्षांपासून आमचे शरीरसंबंध आहेत. शरीरसंबंधाची इच्छा झाल्यानंतर तो बोलवत असे. मात्र, विवाहाचा विषय काढल्यानंतर टाळयचा. सोमवारी (ता. 23) रात्री त्याने एकांतात भेटायला बोलावले होते. यावेळी विवाहाचा विषय काढल्यानंतर त्याने नकार दिला. यामुळे चिडून त्याचे गुप्तांग कापले व थेट पोलिसांकडे गेले.'

ग्रामस्थांनी सांगितले की, 'मौसमीचे अन्य एका युवकासोबत प्रेमसंबंध सुरू झाले होते. नवीन प्रियकर सुरजीतपेक्षा जास्त चांगला असून, श्रीमंत आहे. मौसमी त्याच्यासोबत विवाह करणार होती. परंतु, सुरजीत तिला सोडण्यास तयार नव्हता. यामुळे तिने रागातून हे पाऊल उचलले.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girlfriend surrendered in police station after cutting lovers body part