esakal | परंपरेची नग्नता; पावसासाठी अल्पवयीन मुलीचा छळ!
sakal

बोलून बातमी शोधा

Minor Girl

परंपरेची नग्नता; पावसासाठी अल्पवयीन मुलीचा छळ!

sakal_logo
By
सुधीर काकडे

देशात वेगवेगळ्या धर्मांच्या रुढी परंपरांमध्ये महिलांचा छळ केल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. अशातच लहान मुलीला कपडे काढून दारोदारी भीक मागायला लावल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. हा प्रकार केल्याने चांगला पाऊस पडतो असा स्थानिकांचा समज आहे. मध्यप्रदेशच्या दामोह जिल्हातील जाबेरा ब्लॉकमध्ये ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे गावात भजन गात भीक मागणाऱ्या मुलींसह त्यांचे कुटूंबीय देखील होते.

बनिया गावात घडलेल्या या अघोरी घटनेत नग्नावस्थेत असलेल्या या मुलींच्या खांद्यावर जड खलबत्ता देखील ठेवला होता, असे इंडियन एक्सप्रेसन दिलेल्या या वृत्तामधून समोर आले आहे. गावात घरोघरी जाऊन या मुलींना पीठ, डाळी आणि धान्य मागतात. त्यानंतर गोळा केलेलं हे अन्न-धान्य मंदिरात भंडाऱ्यासाठी दान केलं जातं.

हेही वाचा: कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही : भूपेश बघेल

गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, हे अघोरी कृत्य केल्यानं गावात भरपुर पाऊस पडतो आणि दुष्काळाचा फटका बसत नाही. पाऊस कमी पडत असल्यानं गावातील लोक मुलींच्या संमतीने नेहमीच हा प्रकार करतात. कुटूंबातील लोक स्वत: मुलींना हा प्रकार करण्यासाठी दबाव टाकतात, तरी या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती दामोहचे पोलिस अधिक्षक टेनिवार यांनी दिली आहे.

Case of Minor Girls, Damoh

Case of Minor Girls, Damoh

loading image
go to top