esakal | कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही : भूपेश बघेल
sakal

बोलून बातमी शोधा

bhupel baghel

कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही : भूपेश बघेल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रायपूर: कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, असे छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रविवारी स्पष्ट केले. त्यांचे वडील नंदकुमार यांच्यावर वादग्रस्त विधानाबद्दल प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Corona Update : राज्यात दिवसभरात 4,057 रुग्णांची नोंद

नंदकुमार यांनी नुकतेच उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य केले. ते म्हणाले होते की, ब्राह्मणांना तुमच्या गावात प्रवेश करू देऊ नका असे आवाहन मी भारतातील गावकऱ्यांना करतो आहे. त्यांच्यावर बहिष्कार टाकता यावा म्हणून मी इतर प्रत्येक समाजाशी बोलणार आहे. ब्राह्मणांची रवानगी पुन्हा व्होल्गा नदीच्या किनारी करायला हवी.

याप्रकरणी सर्व ब्राह्मण समाज या संस्थेने तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. डीडी नगर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री १५३ अ (विविध गटांत शत्रुत्व निर्माण करणे) आणि ५०५ (१) (ब) (भीती निर्माण करण्याचा इरादा) अशा दोन कलमांचा त्यात समावेश आहे.

हेही वाचा: एकाच कुटुंबातील पाच मुलं बुडाली; राजस्थानमधील हृदयद्रावक घटना

या पार्श्वभूमीवर बघेल म्हणाले की, माझे सरकार सर्वांच्या पाठीशी आहे. कायदा सर्वोच्च आहे. छत्तीसगड सरकार प्रत्येक धर्म, पंथ, समुदाय आणि त्यांचा भावनांचा आदर करते. माझ्या वडिलांनी एका विशिष्ट समाजाविरुद्ध वक्तव्य केल्यामुळे जातीय शांतता धोक्यात आली आहे. मला त्यांच्या विधानाचे दुःख होते.

कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, मग ते माझे ८६ वर्षांचे वडील असले तरी मुलगा म्हणून मला त्यांचा आदर वाटतो, पण कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल अशी कोणतीही चूक मी माफ करणार नाही.- भूपेश बघेल, छत्तीसगढचे मुख्यमंत्री

loading image
go to top