esakal | Nirbhaya Case : दोषी मुकेश कुमारची आई म्हणते, 'माझ्या मुलाला एक संधी द्या'
sakal

बोलून बातमी शोधा

Nirbhaya Case : दोषी मुकेश कुमारची आई म्हणते, 'माझ्या मुलाला एक संधी द्या'

आरोपींच्या नातेवाईकांचे आंदोलन

डेथ वॉरंटवर झाला निर्णय

- डेथ वॉरंट संवेदनशील विषय

Nirbhaya Case : दोषी मुकेश कुमारची आई म्हणते, 'माझ्या मुलाला एक संधी द्या'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती. यातील चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, या सर्वांना शिक्षा अद्याप दिली गेली नाही. यातील दोषी मुकेश कुमार याची आई म्हणाली, 'या जगात मी एकटी आहे. मला माझ्या मुलाशिवाय इतर कोणीच नाही. त्याला एक संधी द्या'.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणात अक्षय कुमार, मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता आणि विनयकुमार शर्मा या चारही दोषींच्या नातेवाईकांनी दिल्लीत आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी हे चौघेही निर्दोष असल्याचा दावा केला. त्यानंतर आता मुकेश कुमार याची आई म्हणाली, या जगात मी एकटी आहे. मला माझ्या मुलाशिवाय इतर कोणीच नाही. त्यामुळे त्याला एक संधी द्यावी. तसेच पवन गुप्ताच्या बहिणीनेही आपला भाऊ निर्दोष असल्याचे सांगितले. याशिवाय विनय शर्माच्या आईने याबाबत वक्तव्य केले. ती म्हणाली, 'एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी पाच जणांना फाशी देणं चुकीचं आहे'.

Nirbhaya Case : दोषींच्या 'डेथ वॉरंट'वर झाला निर्णय; वॉरंट आता...

आरोपींच्या नातेवाईकांचे आंदोलन

दिल्लीमधील न्यायलयाबाहेर आरोपींच्या नातेवाईकांनी गुरुवारी आंदोलन केले. या प्रकरणातील चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी करण्यात यावं या मागणीसाठी न्यायलयामध्ये पीडितेच्या पालकांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 17 फेब्रवारी रोजी सुनावणी होणार आहे.

डेथ वॉरंट संवेदनशील विषय

‘डेथ वॉरंट’ हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. गुन्हेगाराला सर्व कायदेशीर हक्क उपलब्ध असतात. न्यायालय ते डावलू शकत नाही, असे न्या. धर्मेंद्र राणा यांनी सांगितले.

loading image
go to top