Nirbhaya Case : दोषींच्या 'डेथ वॉरंट'वर झाला निर्णय; वॉरंट आता...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

- चारही दोषींविरोधात नव्याने ‘डेथ वॉरंट’ काढण्यासाठी केलेल्या अर्जांवरील सत्र न्यायालयातील सुनावणी 17 फेब्रुवारीपर्यंत पुढे गेली आहे.

नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र, त्यास अनेकदा याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आता चारही दोषींविरोधात नव्याने ‘डेथ वॉरंट’ काढण्यासाठी केलेल्या अर्जांवरील सत्र न्यायालयातील सुनावणी 17 फेब्रुवारीपर्यंत पुढे गेली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अक्षय, मुकेश आणि विनय या दोषींचा दया अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळले आहेत. तर चौथा दोषी पवन याने मुदत संपूनही दयेचा अर्ज केलेला नाही, त्यामुळे 14 दिवसांचा कालावधी ठेऊन यातील सर्व दोषींविरोधात नवे ‘डेथ वॉरंट’ लगेच काढावे, याबाबतचा अर्ज दिल्ली प्रशासनाने केला आहे. आता राष्ट्रपतींच्या निर्णयाविरुद्ध विनयने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज (शुक्रवार) निकाल देण्याची शक्यता आहे. 

डेथ वॉरंट संवेदनशील विषय

‘डेथ वॉरंट’ हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. गुन्हेगाराला सर्व कायदेशीर हक्क उपलब्ध असतात. न्यायालय ते डावलू शकत नाही, असे न्या. धर्मेंद्र राणा यांनी सांगितले.

Nirbhaya Case : निर्भयाच्या आईला न्यायालयात अश्रू अनावर; म्हणाल्या...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya Case death warrant again Pending