esakal | Coronavirus : सर्व उद्योगांना विशेष पॅकेज द्या - सोनिया गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia-Gandhi

लॉकडाउनमुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार सारे काही ठप्प झाले असून जवळपास बारा कोटी लोक बेरोजगार झाले असून ही संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सरकारने मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्योगांसाठी (एमएसएमई) विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली सरकारकडे केली आहे.

Coronavirus : सर्व उद्योगांना विशेष पॅकेज द्या - सोनिया गांधी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार सारे काही ठप्प झाले असून जवळपास बारा कोटी लोक बेरोजगार झाले असून ही संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सरकारने मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्योगांसाठी (एमएसएमई) विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली सरकारकडे केली आहे.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या क्षेत्राचे देशाच्या एकूण उत्पन्नात एक तृतीयांश एवढे योगदान असल्याचे सांगताना सोनियांनी शेतकरी, मजूर, स्थलांतरितांच्या अडचणींकडे लक्ष वेधले. तसेच रोजगार गेलेल्या कुटुंबांना प्रतिकुटुंब दरमहा किमान साडेसात हजार रुपयांची मदत सरकारने करावी, अशी मागणीही केली.

Coronavirus : एटीएममपासून सावधान; तीन जवानांना कोरोनाची लागण

संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोनिया यांनी आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. आज झालेल्या बैठकीत सोनिया गांधींनी वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त करताना पुरेशा प्रमाणात चाचण्या होत नसल्याची तसेच काँग्रेसच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याची नाराजीही बोलून दाखविली. कोरोनाशी एकजुटीने मुकाबला करण्याची गरज असताना सत्ताधारी सांप्रदायिक द्वेषाचा विषाणू पसरविण्यात गुंतलेला आहे, असे त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारकडून पुरेसा निधी नाही
कोरोनाशी लढण्यासाठी केंद्राकडून ना पुरेशी वैद्यकीय साधने मिळाली, ना जीएसटीचा निधी मिळाला, असा ठपका काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ठेवला आहे. 

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. पंजाबच्या हक्काचा 4000 कोटी रुपयांचा जीएसटी निधी अद्याप केंद्राकडून मिळालेला नाही. एक लाख संचांची मागणी असताना फक्त दहा हजार चिनी बनावटीचे चाचणी संच देण्यात आले असे ते म्हणाले.  राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी, केंद्राच्या पॅकेजखेरीज कोरोनाशी लढता येणार नसल्याचे स्पष्ट केले.