Coronavirus : एटीएममपासून सावधान; तीन जवानांना कोरोनाची लागण

3 army personnel tests positive for coronavirus in Gujarat, ATM booth common source of virus spread
3 army personnel tests positive for coronavirus in Gujarat, ATM booth common source of virus spread

वडोदरा : एटीएममधून पैसे काढताना सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. गुजरातमधील वडोदरातल्या एका एटीएममधून तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सैनिकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मिळालेल्या माहितीनुसार या जवानांनी एकाच एटीएममधून पैसे काढले होते. त्यामुळे एटीएममधूनच तिघांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या जवानांनी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सुरक्षा दलाने या लोकांना क्वारंटाईन केलं असून आता प्रत्येकाची कोरोना टेस्ट करण्याची शक्यता आहे.

Coronavirus : देशात दररोज ५५ हजारांपेक्षा जास्त चाचण्या : डॉ. हर्षवर्धन

एटीएममध्ये हजारो लोकं पैसे काढण्यासाठी येत असतात त्यामुळे एटीएमला बटन दाबतांना हँडग्लोव्जचा वापर केला पाहिजे. देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. पोलिस, सुरक्षा दल तसेच तिन्ही दलांमध्ये देखील कोरोनाचं संक्रमण होत आहे. यापूर्वी महाराष्ट्रात नौदलाच्या जवानांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान, देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. लॉकडाउन असूनही, संक्रमणाचा प्रसार थांबलेला नाही. देशातील कोरोना संक्रमणाचा आकडा २२ हजारांच्या जवळपास पोहोचला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com