
:- नंदकुमार बस्वदे
Global Media Reported Manmohan Singh: भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांचे काल निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झालं होतं आणि त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.