Makar Sankrant Special Surya Namaskar: मकर संक्रांतीनिमित्त देश-विदेशातील 75 लाख लोकांनी घातला सूर्यनमस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amrit Mahotsav

Makar Sankrant: देश-विदेशातील 75 लाख लोकांनी घातला सूर्यनमस्कार

मकर संक्रांतीनिमित्त आयुष मंत्रालयाने आज आसाममध्ये जागतिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये ७५ लाखांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. 'आझादी का अमृत महोत्सव' ( Amrit Mahotsav)अंतर्गत आयोजित कार्यक्रमात आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल (Sarbananda Sonowal)यांनी स्वतः सूर्यनमस्कार घातले. डीडी नॅशनलवर सकाळी ७ ते ७.३० या वेळेत सूर्यनमस्काराचे १३ वेळा थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमात देश-विदेशातील योगशिक्षक आणि योगगुरूही सहभागी झाले होते.

मानवी समाजाचे कल्याण

आयुष मंत्री सोनोवाल म्हणाले, 'सूर्य नमस्कारामुळे चैतन्य आणि प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे कोरोना विषाणूला दूर ठेवण्यास मदत होते हे सिद्ध झाले आहे.' या कार्यक्रमात ७५ लाख लोक सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. वास्तविक यात एक कोटीहून अधिक लोकांनी सहभाग घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या नेतृत्वाखाली देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. देशातील आणि जगभरातील ७५ लाखांहून अधिक लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. यासाठी आयुष मंत्रालय, केंद्रीय मंत्रालय, देश-विदेशातील योग संस्था आणि लोकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. मानव समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येक व्यक्तीने यात सहभाग घेतला असल्याचे ते म्हणाले.

सूर्यनमस्काराचे फायदे

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने लोकांना घरी सूर्यनमस्कार करण्यास आणि व्हिडिओ अपलोड करण्यास सांगितले होते. मंत्रालयाने म्हटले आहे की,सुर्यनमस्कारामुळे मनुष्याचे मन आणि शरीर सक्रिय होते. उर्जेचा प्राथमिक स्त्रोत हा सूर्य आहे. शिवाय सूर्यप्रकाशात असणाऱ्या व्हिटॅमिन डी चा शरीराला चांगला फायदा होतो. जगभरातील डॉक्टर ही या गोष्टीचे समर्थन करतात.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top