

गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोक आणि संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी क्लबच्या मालकाला अटक केली आहे.