Goa: काँग्रेसला धक्का! पक्षप्रमुखानेच धरली तृणमूलची वाट

Goa: काँग्रेसला धक्का! पक्षप्रमुखानेच धरली तृणमूलची वाट

पणजी: गोवा विधानसभेची निवडणूक (Goa Assembly Election 2022) अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना निवडणुकीपूर्वीच अनेक राजकीय हालचाली घडताना पहायला मिळत आहेत. या छोट्या राज्यावर आपली सत्ता स्थापन करता यावी, यासाठी इतर अनेक पक्षही कंबर कसून तयार झाले आहेत. आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) तसेच तृणमूल काँग्रेस पक्षाने (TMC) या ठिकाणी आपलं बस्तान बसवण्यासाठी हालचाली सुरु केलेल्या असताना एकेकाळी सत्ता असलेल्या काँग्रेसमध्ये (Congress) मात्र सगळं आलबेल असल्याचं चित्र नाहीये. आज गोवा काँग्रेसला (Goa Congress) आणखी एक धक्का बसलेला पहायला मिळाला आहे.

Goa: काँग्रेसला धक्का! पक्षप्रमुखानेच धरली तृणमूलची वाट
'राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठीच्या कारणांची यादी तयार'

काँग्रेसचे आमदार अलेक्सो रेजिनाल्ड (Congress MLA Aleixo Reginaldo) यांनी आज विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते नुकतेच कोलकात्यामध्ये पोहोचले असून ते पक्षाचे जनरल सेक्रेटरी अभिषेक बॅनर्जी यांची उद्या भेट घेणार आहेत.

त्यांच्या या राजीनाम्यामुळे काँग्रेसला जबर धक्का बसला असून त्यांच्या या राजीनाम्यामुळे गोवा विधानसभेमध्ये आता काँग्रेसचे दोनच आमदार उरले आहेत. तसेच आमदार प्रतापसिंह राणे हे देखील काँग्रेसच्या तिकिटावर आगामी निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे, असं बोललं जातंय.

Goa: काँग्रेसला धक्का! पक्षप्रमुखानेच धरली तृणमूलची वाट
नवीन कामगार कायदा लागू झाल्यास पगार आणि पीएफमध्ये होईल बदल

अलेक्सो यांनी गोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्याकडे त्यांनी आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अधिकृतपणे जाहीर केलेल्या आठ उमेदवारांपैकी ते एक होते. आता काँग्रेसकडे फक्त दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि प्रतापसिंग राणे हे दोनच आमदार उरले आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे संख्याबळ 2 इतके कमी झाले असून 40 सदस्यीय गोवा विधानसभेचे संख्याबळ 34 वर पोहोचले आहे. आतापर्यंत सहा आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून त्यात काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराचा समावेश आहे. भाजप आणि एक अपक्षाचा देखील यामध्ये समावेश आहे. रेजिनाल्ड हे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष होण्याआधी 'आप'शी जोडले गेले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com