नवीन कामगार कायदा लागू झाल्यास पगार आणि पीएफमध्ये होईल बदल

कामाचे तास, हातातील पगार आणि साप्ताहिक रजेवर पुढील आर्थिक वर्षापासून परिणाम होऊ शकतो
कामगार कायदा
कामगार कायदाकामगार कायदा

तुम्ही कर्मचारी असाल तर कामाचे तास, हातातील पगार आणि साप्ताहिक रजेवर पुढील आर्थिक वर्षापासून परिणाम होऊ शकतो. कारण, भारतात वेतन कामगार कायदे, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षा कायदे हे चार नवीन कायदे (New Labor Act) लागू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे कायदे पुढील आर्थिक वर्ष २०२२ मध्ये लागू केले जाऊ शकतात. या कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर अनेक बदल पाहायला मिळतात.

केंद्र सरकारने (Central Government) यापूर्वीच चार नवीन कामगार कायद्यांना (New Labor Act) अंतिम रूप दिले आहे. आता याबाबत राज्यांकडून नियमांची प्रतीक्षा आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले, कामगार हा समवर्ती विषय असल्याने तो सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी लागू व्हावा, अशी सरकारची इच्छा आहे. सुमारे १३ राज्यांनी व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीवर श्रम संहिता नियमांचा मसुदा तयार केला आहे.

कामगार कायदा
‘आईचा गर्भ अन् कबर’ हेच मुलींसाठी सुरक्षित; सुसाईड नोटमध्ये उल्लेख

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी वेतनावरील कामगार संहितेचा मसुदा तयार केला आहे. त्याचवेळी २० राज्यांनी औद्योगिक संबंध संहितेच्या नियमांचा मसुदा तयार केला आहे. १८ राज्यांनी सामाजिक सुरक्षा संहितेचा मसुदा नियम तयार केला आहे.

चार दिवस काम १२ तास

नवीन कामगार कायदा लागू झाल्यास पुढील आर्थिक वर्षापासून कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवसांऐवजी केवळ चार दिवस (Working hours) काम करावे लागणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना दिवसाला १२ तास काम करावे लागणार आहे. नवीन कायदा लागू झाल्यानंतर आठवड्यातून ४८ तास काम करण्याची तरतूद कायम राहणार असल्याचे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कामगार कायदा
ख्रिसमसनंतर दोन आठवड्यांचा लॉकडाऊन; ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ

मूळ वेतन, पीएफच्या गणनेत होणार मोठे बदल

नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा घरपोच पगारही कमी (Salary) होणार आहे. मात्र, पीएफमधील योगदान वाढेल. नव्या लेबर कोडमध्ये भत्ते ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आले आहेत. यामुळे मूळ वेतन कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराच्या ५० टक्के होईल. एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार ५० हजार असेल तर त्याचे मूळ वेतन २५,००० असू शकते. उर्वरित २५,००० भत्त्यांमध्ये जातील. अशा स्थितीत मूळ पगार वाढला तर पीएफ (PF) जास्त कापला जाईल आणि हातात येणारा पगार कमी होईल. तसेच नियोक्ता किंवा कंपनीचे योगदान वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com