
गोव्यात मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली होती.
गोव्यात प्रमोद सावंतांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; कोंकणी भाषेत म्हणाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आहे. या सोहळ्यात भाजपचे (BJP) ९ मंत्री शपथबद्ध झाले आहेत. यामध्ये वाळपईचे आमदार विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो, फोंड्याचे आमदार रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी सांवत यांनी कोंकणी भाषेत शपथ घेतली. (Pramod Sawant Oath Taking Ceremony)
हेही वाचा: 'मला लेखी धमक्या, सरकार पाडण्यामागे...', पाक PM इम्रान खान यांचा दावा
दरम्यान, प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला असून प्रमोद सावंत यांच्यासह इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह इतर अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा: 'शरद पवार-रामराजेंपुढं हार मानली नाही; 'त्या' आंडू-पांडूंनी माझा नाद करु नये'
देशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुंसडी मारली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत ४० जागांपैकी २० जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर ३ अपक्ष आमदारांनीही समर्थन दिल्याने भाजपच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मात्र मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली होती. कारण विश्वजीत राणेही मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत होते. मात्र अखेर भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
Web Title: Goa Cm Pramod Sawant Swearing Ceremony In Konkani Language Pm Modi Present
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..