शरद पवार-रामराजेंपुढं हार मानली नाही; 'त्या' आंडू-पांडूंनी माझा नाद करु नये - रणजितसिंह निंबाळकर | RanjitSingh Naik Nimbalkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RanjitSingh Naik Nimbalkar vs Sharad Pawar

बारामतीला वळवलेलं पाणी अडवायचं धाडस आम्ही केलंय. त्यामुळं आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय.

'शरद पवार-रामराजेंपुढं हार मानली नाही; 'त्या' आंडू-पांडूंनी माझा नाद करु नये'

फलटण : फलटण शहर (सातारा) : आजवर अनेक सरकारांनी जनतेसाठी कैक योजना बनविल्या, परंतु आपण बनविलेल्या योजना व त्यांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचतो का याकडं कटाक्षानं लक्ष देवून त्याची अंमलबजावणी होण्यासाठीचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार जबाबदारीनं करीत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांनी आपल्या आदर्शवत कार्यप्रणालीनं येथील जनतेची मनं जिंकली आहेत, असं प्रतिपादन केंद्रीय संचार, राज्यमंत्री देवूसिंह चौहान (Devsingh Chauhan) यांनी केलं.

स्वराज फाऊंडेशन व सांसा फाऊंडेशन आयोजित 'शायनिंग महाराष्ट्र' (Shining Maharashtra) या प्रदर्शनाचा समारोप केंद्रीय संचार, राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळूंखे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर, पुणे रिजनच्या जनरल पोस्ट मास्तर मधुमिता दास, भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सांसा फाऊंडेशन व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा: आमदार आराधना मिश्रा सांभाळणार काँग्रेस विधिमंडळाची कमान

केंद्र शासनानं जनतेच्या हितासाठी कोणकोणत्या योजना जनतेसाठी अंमलात आणल्या आहेत, याची माहिती हजारो लोकांनी "शायनिंग महाराष्ट्र" या प्रदर्शनाद्वारे घेतलीय त्याचा लाभही त्यांना निश्चितपणे मिळेल असा विश्वास व्यक्त करुन मंत्री चौहान म्हणाले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचं काम आदर्शवत असून त्यांची प्रेरणा घेत अन्य खासदारांनी काम करायला हवं. फलटण इथं पासपोर्टचे अॉफिस व्हावं, अशी खासदार निंबाळकर यांची सातत्याची मागणी आहे. त्यानुसार फलटण येथील पोस्ट अॉफिसमध्ये पासपोर्टची सुविधा लवकरच उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही मंत्री चौहान यांनी दिलीय. कार्यक्रमाचं प्रास्तविक जयकुमार शिंदे यांनी केलं. सूत्रसंचलन प्रा. सतीश जंगम यांनी केलं, तर अनुप शहा यांनी आभार मानले.

त्या आंडू-पांडूंनी माझा नाद करु नये

बारामतीला वळविलेलं पाणी अडवायचं धाडस आम्ही केलं. त्यामुळं आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. सत्य काय ते लवकरच बाहेर येईल. आपण कदापि मागं हटणार नाही. आपण शरद पवार व श्रीमंत रामराजे यांच्यापुढं हार मानली नाही, तर आंडू-पांडूसमोर मी हार मानणार नाहीय. त्यांनी माझा नादपण करु नये, असा इशाराच खासदार निंबाळकरांनी विरोधकांना दिला.

हेही वाचा: सभापतिपदासाठी भाजपकडून 8 वेळा आमदार राहिलेले सतीश महाना भरणार अर्ज

रामराजे सातशे कोटी म्हणजे सातावर किती शून्य?

अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्याशी जिल्ह्यातील पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा केली होती. त्यानुसार पंतप्रधानांनी दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्पात जिहे-कटापूर योजनेसाठी सातशे कोटी रुपयांची तरतूद केली. सातशे कोटींचा निधी म्हणजे सातावर किती शून्य हे रामराजेंना विचारा, असा टोमणा आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.

Web Title: Mp Ranjitsingh Naik Nimbalkar Criticizes Sharad Pawar At Phaltan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..