देव मुख्यमंत्री बनले तरी सगळ्यांना सरकारी नोकरी नाही मिळणार - गोव्याचे CM प्रमोद सावंत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

नोकरीच्या मुद्यावरून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. सर्वांना सरकारी नोकरी देणं देवाच्याही हातात नाही असं त्यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - नोकरीच्या मुद्यावरून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. सर्वांना सरकारी नोकरी देणं देवाच्याही हातात नाही असं त्यांनी म्हटलं. एका कार्यक्रमावेळी प्रमोद सावंत यांनी पंचायत प्रतिनिधींशी चर्चेवेळी हे वक्तव्य केलं. प्रमोद सावंत म्हणाले की, सर्वांना सरकारी नोकरी देणं शक्य नाही. उद्या देव जरी मुख्यमंत्री झाले तरी हे शक्य नाही.

गोव्यातील लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी 'स्वयंपूर्ण मित्र' सुरू कऱण्यात आलं आहे. सरकारच्या पुढाकाराने स्वयंपूर्ण मित्र हे राजपत्रित अधिकारी पंचायतींचा दौरा करतील आणि विकासाच्या योजनांना ग्राउंड लेव्हलवर लागू करण्यासाठी उपाययोजना करतील. गावातील साधने कोणती? त्यांचा वापर करण्याबाबत नागरिकांना सल्ला देऊन आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत केली जाईल. 

हे वाचा - दिवाळीआधी Good News! इजिप्त, भुतानहून आलेल्या कांदे-बटाटेंमुळे कमी होणार महागाई

गोव्यात राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक विशेष मोहिम सुरू केली आहे. याअंतर्गत 32 रुपये प्रति किलो दराने कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी याची माहिती दिली. कांद्याच्या किंमती सातत्याने वाढत असून बुधवारी गोव्याच्या राज्य मंत्रिमंडळाने स्वस्तात कांदा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

राज्य सरकारने म्हटलं की,नॅशनल अॅग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंक फेडरेशन (नाफेड) कडून 1 हजार 45 मेट्रिक टन कांदा खरेदीचे आदेश देण्यात आले असून याचा पूरवठा रेशन कार्ड धारकांना दिला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: goa cm says even god cant give government jobs to all