गोवा काँग्रेसला वाचवण्यासाठी सोनिया गांधींनी संकटमोचक म्हणून महाराष्ट्राच्या नेत्याला पाठवलंय

काँग्रेसकडून मायकेल लोबो यांची गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आलीये
goa political news latest update
goa political news latest update
Summary

काँग्रेसकडून मायकेल लोबो यांची गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आलीये

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मायकल लोबो यांच्यासह त्यांचे पाच आमदार बेपत्ता आहेत. हे आमदार भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींदरम्यान काँग्रेसकडून मायकेल लोबो यांची गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाने या दोन्ही नेत्यांवर भाजपच्या संगनमताने पक्षाविरोधात कट रचल्याचा आरोप केला आहे. (goa political news latest update)

यासंदर्भात काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सांगितले, लोबो आणि कामत यांच्याशिवाय पक्षाच्या इतर तीन आमदारांशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुकुल वासनिक यांना गोव्यात जाण्याची सूचना केली आहे. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली. दरम्यान, आज गोव्यात कॉंग्रेसमध्ये नवीन विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती केली जाणार आहे.

goa political news latest update
पोलिसांच्या कमतरतेमुळे आंबोलीत तीन ते चार तास वाहतूक कोंडी

दरम्यान, जीपीसीसीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितलेल्या माहिती अशी की, सीएलपीची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेसचे पाच आमदार उपस्थित असून सीपीएल नेत्याला पदावरून हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. आज सकाळपर्यंत नवीन सीएलपी नेत्याची नियुक्ती केली जाणार असून ही माहिती सभापतींपर्यंत पोहोचवली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव म्हणाले, काँग्रेमधूनन सत्ता उपभोगत असणारे आज सत्तेसाठी लोभी झाले आहेत. मी मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्याबद्दल खूप निराश आहे. सत्ता येत जात राहते मात्र राजकारणात सत्तेसाठी नाही तर तत्त्वांसाठी लढायचे असते.

पुढे ते म्हणाले, पक्षाचे पाच आमदार लोबो, कामत, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि डेलियाला लोबो यांच्याशी संपर्क झालेला नाही. एल्टन डी कोस्टा, संकल्प आमोणकर, युरी आलेमाओ, कार्लोस अल्वारेस फरेरा, रुडॉल्फ फर्नांडिस हे पाच आमदार कॉंग्रेससोबत आहेत. सहावे आमदार अलेक्सो सिक्वेरा हे पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असून ते काँग्रेससोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

goa political news latest update
मंत्री परबांच्या त्रासाला कंटाळूनच मी बंड केलं, आमदार कदमांचा खुलासा

गोव्यातील कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपसोबत कट रचला आहे. या नेत्यांना गोव्यात काँग्रेसची ताकद कमी करायची आहे. कॉंग्रसेला कमकुवत आणि पक्षांतर करण्याचा प्रयत्न असल्याने ते भाजपसोबत गेले आहेत. कॉंग्रेसचे दोन बडे नेते या कटाचं नेतृत्व करत आहेत. दिगंबर कामत यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून स्वतःच्या संरक्षण करण्यासाठी त्यांनी हे पाऊस उचलेले आहे. तर मायकल लोबो यांनी सत्ता आणि पदासाठी हे पाऊल उचलले. त्यामुळे लवकरच कॉंग्रेस नवा नेता निवडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com