A 28-year-old doctor has been arrested in Solapur for sexually assaulting : गोव्यात उपचाराच्या नावाखाली परदेशी तरुणीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २८ वर्षीय डॉक्टर तरुणाला सोलापुरातून ताब्यात घेतलं आहे. वृषभ दोशी असं या डॉक्टर तरुणाचं नाव आहे. त्याने आयसीयूमध्ये असताना तरुणीवर अतिप्रसंग केल्याचा आरोप करण्यात येत आहे.