

dr-anjali-nimbalkar
esakal
शनिवारच्या दुपारी गोव्याहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका अमेरिकन प्रवाशाच्या प्रकृतीने अचानक बिघाड झाल्याने संपूर्ण विमानात घबराट निर्माण झाली. कॅलिफोर्नियाची रहिवासी असलेली ३४ वर्षीय जेनी ही आपल्या बहिणीसह दिल्लीतील एका लग्नसमारंभाला हजेरी लावण्यासाठी प्रवास करत होती. विमान उड्डाण घेतल्यानंतर फक्त दहा मिनिटांनी, दुपारी सव्वाएक वाजता, जेनीला अस्वस्थ वाटू लागले. तिला थरथर कापायला लागली आणि काही क्षणांतच ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली.