esakal | जनमन उत्सव: दुसरा 'जननी जन्मभूमी कौल’
sakal

बोलून बातमी शोधा

Janani Janmabhoomi Kaul

जनमन उत्सव: दुसरा 'जननी जन्मभूमी कौल’

sakal_logo
By
सुधीर काकडे

गोव्यात 1967साली एक ऐतिहासिक जनमत कौल घेण्यात आला होता. पुरोगामित्वाच्या जाणिवा जोपासणाऱ्या एका छोट्याशा भूप्रदेशाने आपली सांस्कृतिक आणि भौगौलिक अभिव्यक्ती एका विस्तृत प्रवाहात लोप पावू नये म्हणून जनतेने केलेले प्रगल्भ मतदान या कौलाला ऐतिहासिक बनवून गेले होते.

देशाच्या इतिहासातील या एकमेवाद्वितीय कौलाला आज 54 वर्षे उलटली असताना गोव्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जाणिवा तितक्याच दृढ आहेत का असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती सध्या गोव्याती अवतीभवती निर्माण झाली आहे. तेव्हा गोव्याला, गोमंतकियाना याची जाणीव आहे का? त्याच्या अंत:करणात याविषयी काही कलह माजलेला आहे का? सांस्कृतिक स्खलनाच्या या प्रक्रियेला थोपवण्याची मनिशा तो बाळगतो का? की तो केवळ काहींच्या विचार विलसितांचाच भाग आहे? यासांरख्या अमेक प्रश्नांच्या मुळाशी जायचे ‘गोमंतक’ने ठरवले आहे.

गोव्याच्या जनतेच्या मनात जिव्हाळ्याचे अधिष्ठान असलेल्या या दैनिकाने माध्यमांच्या जबाबदारीविषयीची पारंपरिक चौकट भेदून एक नवे पाऊल टाकताना गोमंतकियाना काय हवे आहे, काय अपेक्षित आहे हेच जाणून घेण्यासाठी एका नव्या जनमत कौलाचा संकल्प गोमन्तक घेऊन आलेय. हा ‘जननी जन्मभूमी कौल’ राज्याच्या आणि देशाच्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाला पुढच्या किमान पन्नास वर्षांसाठीच्या नियोजनासाठी प्रवृत्त आणि कार्यरत करणार, असा आमचा विश्वास आहे. जसा पहिल्या जनमताचा फायदा आजवर झाला तसाच या दुसऱ्याही ‘जननी जन्मभूमी कौल’चा फायदा राज्याच्या विकासासाठी होणार अशा आम्हाला खात्री आहे.

गोव्याचे वर्तमान नितळ व्हावे आणि भविष्य आश्वासाक असावे या एकमेव हेतूने ‘गोमंतक’ने हे शिवधनुष्य उचलायचा निग्रह केला आहे. गोमंतकीय समाज मूढ नाही हे दर्शवणारा हा ‘जननी जन्मभूमी कौल’ यशस्वी करणे हे प्रत्येक स्वाभिमानी गोमंतकियाने आपले आद्य कर्तव्य मानावे, हीच विनंती.

loading image
go to top