Firefighters and rescue teams at the burnt nightclub in Arpora, Goa, where a late-night fire claimed 23 lives due to suspected cylinder explosion and safety lapses.
esakal
Goa Nightclub Fire : गोव्यात नाईट क्लबमध्ये अग्नितांडव, २३ जणांचा होरपळून मृत्यू; राष्ट्रपती अन् पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Summary
गोव्याच्या अर्पोरा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबमध्ये भीषण आग लागून २३ जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये ३ महिला आणि २० पुरुष असून बहुतेक क्लबचे कर्मचारी असल्याचे सांगितले जाते.
रात्री १२:०४ वाजता सिलिंडर स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Goa Nightclub Fire Accident : गोव्यात एक भीषण दुर्घटना समोर आली आहे. उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमियो लेन क्लबमध्ये काल रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत किमान २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि २० पुरुषांचा समावेश आहे, त्यापैकी बहुतेक क्लब कर्मचारी असल्याचे असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी मध्यरात्री १२:०४ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. सिलिंडरच्या स्फोटामुळी ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

