Goa : नाइटक्लबचा मालक गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअर, २२ शहरं आणि ४ देशांमध्ये व्यवसाय; कोण आहे सौरभ लुथरा?

गोव्यात नाइटक्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी नाइट क्लबच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. या नाइटक्लबच्या पाडकामासाठी नोटीस बजावण्यात आली होती मात्र नंतर त्याला स्थगिती दिली होती.
Gold Medalist Engineer Turned Businessman Saurabh Luthra

Gold Medalist Engineer Turned Businessman Saurabh Luthra

Esakal

Updated on

गोव्यातील नाइट क्लबमध्ये आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. क्लबच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय. इतकी भीषण आग कशी लागली? नाइट क्लबमध्ये आगीपासून संरक्षणासाठी पुरेशी यंत्रणा नव्हती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता अशीही माहिती समोर येतेय की क्लब परवान्याशिवाय उभारण्यात आला होता. त्याचे दरवाजे लहान आणि आपत्कालीन परिस्थितीत धोकादायक होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com