
प्रमोद सावंत घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; PM मोदींसह दिग्गजांची उपस्थिती
विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. आज ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सकाळी 11 वाजता डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.
तीनवेळा आमदार असलेले प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 20 जागा जिंकून पुन्हा सत्तेवर आणले. दरम्यान या शपथविधी सोहळ्याला 10 हजारांहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गोव्याचे मुख्यमंत्री राजभवन संकुलाबाहेर शपथ घेण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. 2012 मध्ये, मनोहर पर्रीकर यांनी पणजीच्या कम्पाल ग्राउंडवर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.
हेही वाचा: भाजपकडून राष्ट्रपतीपदाची ऑफर? मायावती यांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या..
11 मंत्री घेऊ शकतात
शपथविधी सोहळ्यात किती कॅबिनेट मंत्री शपथ घेतील याचा खुलासा भाजपने अद्याप केलेला नाही. यावर सावंत यांनीही मौन बाळगले आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार गोव्याच्या मंत्रिमंडळात आणखी 11 मंत्री असू शकतात.
डीजीपी इंदर देव शुक्ला यांनी उद्याच्या शपथविधी समारंभाच्या आधी पणजी येथील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सुरक्षेचा आढावा घेतला . ते म्हणाले की, पंतप्रधान, गृहमंत्री, किमान 15 मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर येत आहेत, त्यांच्या सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी किमान 2000 लोक येथे कार्यरत आहेत. ड्रोनचाही वापर केला जात आहे. 700 वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा: लवकरच येतेय महिंद्राची 'ही' स्वस्त इलेक्ट्रिक कार; काय असेल किंमत?
Web Title: Goa Pramod Sawant Take Oath As Chief Minister Pm Modi Will Attend The Ceremony
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..