
लवकरच येतेय Mahindra ची स्वस्त इलेक्ट्रिक कार; काय असेल किंमत?
दिग्गज ऑटोमेकर महिंद्रा यावर्षी अनेक वाहने लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, यापैकी एक कार ही महिंद्राची इलेक्ट्रिक eKUV असणार आहे. त्यामुळे कंपनी या वर्षी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत असून यासोबत इलेक्ट्रिक वाहन बाजारातील स्पर्धा वाढणार आहे..
तज्ञांच्या मते, इलेक्ट्रिक XUV 300 2023 च्या सुरुवातीला येईल आणि eKUV100 चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे आणि 2022 च्या अखेरीस बाजारात येईल. EKUV ला मागच्या ऑटो शो एक्सपोमध्ये सादर करण्यात आले होते. महिंद्राचा ईव्ही क्षेत्रातील पदार्पन हे एका महत्त्वपूर्ण वळणावर आहे. Treo आणि eAlpha सारख्या उत्पादनांसह तीन चाकी वाहने आणि लहान LCV च्या व्यावसायिक विभागात कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत.
eKUV ची किंमत आणि रेंज काय असेल
पुर्वीचा अवतार म्हणून ते e2O स्वरुपात पुन्हा लाँच केले जाऊ शकते. आशा व्यक्त केली जात आहे की ही कार एका चार्जमध्ये किमान 250 किमी पेक्षा जास्त अंतर कव्हर करेल आणि परवडणाऱ्या किंमतीसह येईल. कंपनी ही कार 10 लाख रुपयांच्या आत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून लॉन्च करू शकते.
हेही वाचा: पुण्यात Ola S1 pro इलेक्ट्रिक स्कूटरला आग; कंपनी म्हणते की..
टाटा मोटर्स ईव्ही मार्केटमध्ये आघाडीवर
पर्सनल सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक कारच्या पोर्टफोलिओसह प्रतिस्पर्धी टाटा मोटर्सने अलीकडच्या काळात 70% पेक्षा जास्त मार्केट शेअरसह पहिले स्थान पटकावले आहे. टाटाच्या इलेक्ट्रिक कारची विक्री जोमाने होत आहे. यादरम्यान मार्च 2021 मध्ये, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (MEML), एक स्टेप-डाउन उपकंपनीला त्यांच्या कंपनीमध्ये समाविष्ट केले आहे.
त्यामुळे इलेक्ट्रिक मोबिलिटीवर लक्ष केंद्रित करण्याचा एक भाग म्हणून, महिंद्रा कंपनीने लास्ट माईल मोबिलिटी (LMM) आणि SUV EV प्लॅटफॉर्मच्या लॉन्चमधील संधींचा फायदा घेण्यासाठी 3,000 कोटी रुपयांच्या नवीन भांडवली गुंतवणूकीची घोषणा केलीआहे. पुढील 3-5 वर्षांत ही इलेक्ट्रिक वाहने बाजारात येतील. महिंद्रा येत्या 5 वर्षांत अनेक इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणू शकते.
हेही वाचा: भाजपकडून राष्ट्रपतीपदाची ऑफर? मायावती यांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या..
Web Title: Mahindra Ready To Launch Electric Car Ekuv 2022 This Year Check Details
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..