
पणजी : फर्मागुढी-फोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारे हाय-टेक डिजिटल संग्रहालय उभे राहणार आहे. राज्यातील हे पहिलेच डिजिटल संग्रहालय असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सुसंगत पद्धतीने, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनुभवता येईल, असे गोवा सरकारने सांगितले.