गोकाक : गोकाक तालुक्यातील चिक्कनंदी (Chikkannandi) गावाजवळ आत्महत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. प्रेमसंबंध (Love Affair) असलेल्या तरुण आणि तरुणीने रिक्षामध्ये एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. मृतांची नावे राघवेंद्र नारायण जाधव (वय २८) व रंजिता आडिवेप्पा चौबारी (वय २५, दोघेही रा. रामलिंगनगर, मुन्नोळी, ता. सौंदत्ती) अशी आहेत.