Gokak Falls Revived Amid Summer Season
esakal
गोकाक : घटप्रभा नदी कोरडी पडून नदीकाठावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्याची, तसेच पिकांची आणि जनावरांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी घटप्रभा नदीपात्रात एक टीएमसी पाणी सोडण्यात येत (Gokak Falls Water Release) आहे. हे पाणी गोकाक येथे धबधब्यावरून खाली दरीत कोसळत असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पर्यटकांना धबधबा पाहण्याची पर्वणी मिळाली आहे.