काळ्या कपड्यातून सोन्याची तस्करी; पश्चिम बंगालमध्ये ६ कोटींचा मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smuggling

काळ्या कपड्यातून सोन्याची तस्करी; पश्चिम बंगालमध्ये ६ कोटींचा मुद्देमाल जप्त

कोलकत्ता : भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (Border Security Force) जवानांनी पश्चिम बंगालमधील परगाना येथील सीमाभागात सोन्याची तस्करी करणाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून ७४ सोन्याचे बिस्कीट जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान दोन वेळा झालेल्या या धाडीत जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ही ६ कोटी १५ लाख असल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सांगितलं आहे.

पश्चिम बंगालमधील उत्तर परगणा या भागात झालेल्या धाडीत ११.६२ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. बांग्लादेशातून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची नजर चुकवून हे सोनं भारतात आणलं जात होतं. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ६ कोटी १५ लाख १८ हजार एवढी असल्याचं जवानांनी सांगितलं. पहिल्या धाडीत बांग्लादेशमधून भारतात येणाऱ्या एका ट्रकची तपासणी सुरक्षा दलाच्या जवानांनी केली त्यावेळी त्यांना गाडीत काळ्या कपड्यात गुंडाळलेला बॉक्स सापडला होता.

हेही वाचा: राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीमागे शरद पवार? मनसेने शेअर केले फोटो

ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे हा बॉक्स सापडला असून त्यात त्यांना ११.६२ किलो वजनाचे ७० सोन्याचे बिस्कीट आणि तीन पट्ट्या सापडल्या. त्यानंतर हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू असल्याचं सुरक्षा दलाच्या जवानांनी सांगितलं आहे. दुसऱ्या प्रकरणात जयंतीपूर येथील सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या १५८ बटालियने एका व्यक्तीच्या चौकशीत त्यांना ४६६ ग्रॅमचे एक सोन्याचे बिस्कीट सापडले. सोमवारी सकाळी सदर व्यक्तीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

राज मंडल असं ताब्यात घेण्यात आलेल्या चालकाचं नाव असून तो बांग्लादेशमध्ये मालवाहतूक करतो. बांग्लादेशमध्ये माल खाली करून परत येत असताना त्याच्याकडे एका अनोळखी व्यक्तीने काळ्या कपड्यात गुंडाळलेला बॉक्स दिला होता. तो बानगाव येथील शेफाली ट्रक पार्किंमधील एका व्यक्तीकडे देण्यास सांगितले होते. हा बॉक्स पोहोच केल्यावर चालकाला १० हजार रूपये मिळणार होते असं चौकशीतून समोर आलं आहे.

Web Title: Gold Biscuit Smuggling West Bengal Two Arrest Bsf

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :goldsmuggler
go to top